चंदीगड : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Punjab Terror Plot) घडवून आणण्याचा कट पंजाब पोलिसांनी वेळेत उधळून लावत मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI (इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स) हिच्याशी संबंध असल्याच्या आरोपाखाली चार अल्पवयीन मुलांसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पंजाबसह देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, या नेटवर्कचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Punjab Terror Plot)
पंजाब पोलिसांनी (Punjab Police) दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून तीन बेकायदेशीर पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसे आणि पेट्रोल बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेट्रोलच्या चार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली असून त्यांची तपासणी सुरू आहे. (Punjab Terror Plot)
नवी दिल्ली : थायलंडच्या फुकेत शहरावरून दिल्लीकडे येणाऱ्या 'एअर इंडिया'च्या विमानाला मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी हवेत अचानक मोठा धक्का (टर्ब्युलन्स) बसल्याची ...
परदेशातील हँडलर्सच्या संपर्कात होते संशयित :
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी थेट परदेशात बसलेल्या ISI च्या हँडलर्सच्या संपर्कात होते. त्यांच्या सूचनांनुसार पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी विविध कारवायांचे नियोजन करण्यात आले होते. या तरुणांना सोशल मीडियाद्वारे आणि एन्क्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून संपर्क साधून दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. (Punjab Terror Plot)
सुरक्षा यंत्रणांवर पाळत ठेवण्याचे काम :
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या संशयितांना राज्यातील महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांवर नजर ठेवणे, संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करणे, बेकायदेशीर शस्त्रांची साठवण करणे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वातावरण तयार करणे अशी जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, आरोपींनी रेल्वे मार्गांच्या परिसरात आणि संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा यंत्रणांच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या माध्यमातून महत्त्वाची माहिती परदेशातील हँडलर्सपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Punjab Terror Plot)
'आजारपणात जोडीदाराची साथ सोडणे अमानुष'; मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला लग्नानंतर पत्नीला झालेल्या शारीरिक अडचणीमुळे ...
फरार साथीदारांचा शोध सुरू :
या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून, त्यांच्या देशांतर्गत आणि परदेशातील संपर्कांची चौकशी केली जात आहे. पंजाब पोलिसांनी या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी विविध केंद्रीय सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधला आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, देशातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. (Punjab Terror Plot)





