Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्नेहल ज्ञानदेव बेंदे हिच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Shalarth ID Scam : राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला ...
नेमकं काय घडलं ?
फिर्यादी प्रीती बोठे ही विद्यानगर येथील रहिवासी असून प्रीती बोठे यांच्या घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये दैनंदिन वापरातील सोन्याचे दागिने तसेच व्यवसाय व बचत गटाचे एक लाख रूपये रोख ठेवले होते. स्नेहल बेंदे ही फिर्यादीची मैत्रीण असून दोघी 2022 ते 2025 या कालावधीत न्यू लॉ कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. त्यामुळे तिचे फिर्यादीच्या घरी नियमित येणे-जाणे होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 29 जुलै रोजी दुपारी स्नेहलने मोबाईलवर मेसेज पाठवून तिला मुलगा पाहण्यासाठी येणार असल्याने सांगून साडी हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास ती फिर्यादीच्या घरी आली. (Ahilyanagar Crime News)
Nashik : शेतकऱ्यांसाठी जमीन म्हणजे सर्व काही असतं. मात्र हीच जमीन जर परस्पर तिसराच विकत असेल तर... तर पायाखालचीही जमीन सरकेल ! नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) ...
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा
ज्या खोलीत कपाटात दागिने ठेवले होते, त्याच ठिकाणी साड्या असल्याने स्नेहल साडी परिधान करून पाहण्यासाठी त्या खोलीत गेली. त्यावेळी फिर्यादी दुसर्या खोलीत असल्याने स्नेहल काही काळ एकटीच बेडरूममध्ये होती. त्यानंतर तिने दोन साड्या घेऊन घरातून निघून गेली. दरम्यान, शनिवारी (1 ऑगस्ट) दुपारी बचत गटातील पैसे घेण्यासाठी एक महिला फिर्यादीच्या घरी आली त्यावेळेस प्रीती या कपाटातून पैसे काढण्यासाठी गेल्या. मात्र, कपाटातील रोख रक्कम दिसून न आल्याने तात्यांनी घाबरलेल्या. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिनेही तपासले मात्र तेही गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी स्नेहल बेंदे हिनेच दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप करत तिच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Ahilyanagar Crime News)
Dhule Crime : कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न सध्या वाढत्या लाचखोरीच्या प्रकरणांने सर्वसामान्य जनतेला पडत आहे. धुळे जिल्ह्यात असाच एक ...
14 तोळ्याचे दागिने लंपास
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे पाच तोळ्यांचे मिनी गंठण, 2.5 तोळ्यांचे मिनी मंगळसूत्र, दोन तोळ्यांची सोन्याची कर्णफुले, अर्धा तोळ्याचे कानातील दागिने, प्रत्येकी एक तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, अर्धा तोळ्याची सोन्याची नथ, दोन ग्रॅमचे सोन्याचे मणी, दोन ग्रॅमच्या सोन्याच्या फिरक्या आणि एक लाख रूपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.






