Online Shopping Scam : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनो सावधान! डिलिव्हरीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; OTP देण्यापूर्वी ही एक चूक करू नका

नोएडा : ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping Scam) करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांच्या पार्सलमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचा नोएडा पोलिसांनी (Noida Police) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ७५ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्राहकांना पार्सल स्वीकारताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Online Shopping Scam)


डीसीपी साद मियां खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारिस खान, सुनील कुमार, विजय सिंह, धर्मेंद्र आणि सूरज सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर भूपेंद्र आणि असलम उर्फ राजू खान हे दोघे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. (Online Shopping Scam)



महागड्या वस्तू काढून ठेवायचे स्वस्त सामान :


पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ही टोळी सक्रिय होती. ई-कॉमर्स कंपन्यांची महागडी पार्सल डिलिव्हरीसाठी बाहेर पडल्यानंतर आरोपी ती उघडत असत. त्यानंतर पार्सलमधील महागडा मूळ माल काढून त्याऐवजी स्वस्त किंवा असंबंधित वस्तू ठेवून पुन्हा पॅक केले जात होते. त्यामुळे ग्राहकांच्या हातात चुकीचा माल पोहोचत होता, तर चोरी केलेल्या वस्तू आरोपी बाजारात विकून लाखो रुपयांची कमाई करत होते. (Online Shopping Scam)



७५ लाखांचा मुद्देमाल जप्त :


पोलिसांच्या कारवाईत प्रोटीन सप्लिमेंट्स, ब्रँडेड शूज, कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मुलांसाठीची वायरलेस उपकरणे, कान आणि रक्तदाब तपासण्याची वैद्यकीय उपकरणे, स्मार्ट डिव्हाइसेस तसेच विविध ई-कॉमर्स कंपन्यांचे टॅग आणि पॅकिंग साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व साहित्याची किंमत सुमारे ७५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Online Shopping Scam)



मास्टरमाईंड कोण?


चौकशीदरम्यान या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार वारिस खान असल्याचे समोर आले आहे. टोळीतील प्रत्येक सदस्याला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती. काही जण पार्सलमधील वस्तू बदलत, तर इतर सदस्य चोरीचा माल बाजारात विकण्याचे काम करत होते. या प्रकरणी सेक्टर-२० पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (Online Shopping Scam)


ऑनलाइन पार्सल स्वीकारताना शक्य असल्यास पार्सल उघडून वस्तू तपासा. वस्तू योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच OTP शेअर करा. काही संशयास्पद पार्सल आढळल्यास तातडीने ई-कॉमर्स कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी आणि पोलिसांशी संपर्क साधा. (Online Shopping Scam)

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी