Wednesday, July 29, 2026

LIC of India : एलआयसी ऑफ इंडियातर्फे भारत सरकारला १२,२०७ कोटी रुपये लाभांशाचा धनादेश सुपूर्द

LIC of India : एलआयसी ऑफ इंडियातर्फे भारत सरकारला १२,२०७ कोटी रुपये लाभांशाचा धनादेश सुपूर्द

मुंबई : एलआयसी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. आर. दोराईस्वामी यांनी आज केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांना १२,२०७.२५ कोटी रुपये लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला. २७ जुलै २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर केल्यानुसार, भारत सरकारचा हा लाभांशाचा हिस्सा आहे.

यावेळी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय लोहिया तसेच एलआयसी ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर पटनायक, व्यवस्थापकीय संचालक आर. चंदर आणि उत्तर विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक (प्रभारी) एन. एस. राघवा हे अधिकारी उपस्थित होते.एलआयसी आपल्या स्थापनेपासून ७० गौरवशाली वर्षे पूर्ण करत असून, ३१ मार्च २०२६ रोजी तिची एकूण मालमत्ता ५९.०३ लाख कोटी रुपये इतकी आहे. भारतीय आयुर्विमा बाजारपेठेत कंपनीचे वर्चस्व कायम आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >