Commonwealth Games 2026 : अंकुश पांघलने इंग्लंडच्या बॉक्सरला धूळ चारत जिंकले सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर अंकुश पांघल याने ८० किलो वजनी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात सुरुवातीला मागे पडल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत त्याने यजमान इंग्लंडच्या डिमेझी शिट्टूचा ४-१ असा पराभव केला आणि भारताच्या पदकांमध्ये आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.अशा प्रकारे जिंकला अंतिम सामना
सामन्याची सुरुवात अंकुशसाठी सोपी नव्हती. पहिल्या फेरीत इंग्लंडच्या खेळाडूने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली होती. परंतु, खचून न जाता अंकुशने दुसऱ्या फेरीत अचूक पंच आणि उत्कृष्ट रणनीतीच्या जोरावर सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
तिसऱ्या फेरीत अंकुशने रिंगमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवले. याच फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूचा एक गुण वजा झाल्यामुळे सामन्याचे पााचडे भारताच्या बाजूने झुकले. अखेर पंचांनी ४-१ अशा विभाजित निर्णयाने अंकुशला विजेता घोषित केले.



भारतीय बॉक्सिंग पथकाची दमदार कामगिरी


शनिवारी बॉक्सिंग प्रकारात भारताने एकूण ९ पदके जिंकली, ज्यामध्ये ७ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांचा समावेश आहे.


सुवर्णपदक विजेते: अंकुश पांघल, सचिन सिवाच, अरुंधती, प्रिया, साक्षी, प्रीती आणि जास्मिन.
रौप्यपदक विजेते: लव्हलिना आणि जादुमणी सिंग.तसेच सचिन सिवाचने ६० किलो वजनी गटात नामिबियाच्या खेळाडूचा ३-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.



🏆 भारत चौथ्या स्थानावर:


बॉक्सिंगमधील या यशासह, पुरुषांच्या शॉटपुट आणि ज्युडोमधील पदकांच्या जोरावर भारताने पदक तालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत ११ सुवर्ण, १६ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण ३५ पदके जमा झाली आहेत.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला