Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गालानगर परिसरालगत असलेल्या या तलावात सोहेल शेख या तरुणाचा बुडून मृत्यू (18-year-old youth drowns) झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. (Nalasopara News)



वारंवार तक्रारी करूनही सुरक्षा उपाय नाहीत, नागरिकांचा आरोप :


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नागेला तलाव (Nagela Lake) परिसरात यापूर्वीही बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, वारंवार लेखी तक्रारी करूनही तलावाभोवती संरक्षक कठडे, धोक्याचे इशारा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, बचाव साहित्य आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तलाव परिसरात योग्य सुरक्षाव्यवस्था असती तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (Nalasopara News)



सुशोभीकरणावर खर्च, पण सुरक्षेकडे दुर्लक्ष?


नागेला तलावाच्या (Nagela Lake) सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. "तलावाचे सौंदर्यीकरण करण्यापेक्षा नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. योग्य नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था असती तर ही दुर्घटना टाळता आली असती," असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. (Nalasopara News)

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी