मुंबई : दिल्ली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा 'एआय-जनरेटेड' व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) गैरवापर आणि खोट्या प्रचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
- राज्यात नवे धोरण येणार; प्रत्येक रुग्णवाहिकेवर असणार शासनाची डिजिटल नजर मुंबई : राज्यातील रुग्णवाहिका (अँम्ब्युलन्स) सेवा अधिक सक्षम, सुरक्षित, ...
भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबरच्या नोडल पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आपल्या 'एक्स' खात्यावरून दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमीत झा यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ समाजात संभ्रम पसरवणारा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यावरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५३(२) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
Nashik : नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचा वाढता रोष आणि अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी प्रशासनाला थेट ...
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची पीआयबी आणि दिल्ली पोलिसांनी तात्काळ दखल घेत डीसीपी सुमीत झा यांच्या राजीनाम्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित व्हिडिओ १०० टक्के बनावट आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे या यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फेक एआय व्हिडिओच्या आधारे जनतेची फसवणूक करणे गंभीर स्वरूपाचे असून, जगताप (Bhai Jagtap) यांनी तो व्हिडिओ हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून (Maharashtra cyber police) या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






