Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) दरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, संप्रेषण व्यवस्था आणि पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित तांत्रिक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने आज नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) बैठक घेतली. त्यानंतर समितीने नाशिकमधील प्रमुख कुंभस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित तांत्रिक सुविधांचा आढावा घेतला. समिती उद्या शनिवारी त्र्यंबकेश्वरमधील कुंभस्थळांची पाहणी करणार आहे. (Simhastha Kumbh Mela 2027)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; चिरागनगर येथील स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे ...
सिंहस्थासाठी तांत्रिक सज्जतेचा आढावा
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Authority Commissioner Shekhar Singh) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य प्रा. दीपांकर चौधरी (आयआयटी मुंबई), महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव रतनसिंह परदेशी, तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Simhastha Kumbh Mela 2027)
Nashik News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पॅरा-अॅथलेटिक्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. या सुवर्णयशात नाशिक ...
तांत्रिक सल्लागार समितीकडून कुंभस्थळांची पाहणी
बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाने सिंहस्थ २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) साठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन आराखडा, कमांड अँड कंट्रोल व्यवस्था, सीसीटीव्ही नेटवर्क, संप्रेषण प्रणाली, पूर्वसूचना यंत्रणा आणि इतर तांत्रिक उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रस्तावित तांत्रिक प्रणालींची आवश्यकता, त्यांची उभारणी, तैनाती आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यावर समितीने सविस्तर चर्चा केली. (Simhastha Kumbh Mela 2027)
Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ...
उद्या त्र्यंबकेश्वर येथील कुंभक्षेत्राची पाहणी
बैठकीनंतर समितीने नाशिकमधील प्रमुख कुंभस्थळांची पाहणी करून तेथील भौगोलिक परिस्थिती, भाविकांच्या हालचालीचे संभाव्य मार्ग, नियंत्रण व्यवस्था आणि विविध तांत्रिक प्रणालींच्या प्रस्तावित स्थापनेचा आढावा घेतला. या पाहणीच्या आधारे समिती शासनाला आवश्यक तांत्रिक शिफारशी सादर करणार असून त्यानुसार सिंहस्थासाठी प्रस्तावित तांत्रिक यंत्रणांच्या अंमलबजावणीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. उद्या समिती त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील कुंभक्षेत्राची पाहणी करून तेथील प्रस्तावित व्यवस्थेचाही आढावा घेणार आहे.