Hyderabad: मेटा इंडियाचे प्रमुखांसह सोशल मीडिया खात्यांविरोधात गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एआय-आधारित आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण


हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून तयार करण्यात आलेले आणि डिजिटलरीत्या एडिट आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या आरोपांवरून हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास तसेच अनेक फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई तेलंगणातील उद्योजक एस. अरविंद रेड्डी आणि भाजप कार्यकर्ते टी. साईकिरण गौड यांनी दिलेल्या तक्रारींनंतर करण्यात आली.तक्रारीनुसार, इन्स्टाग्रामवर ब्राउझिंग करत असताना त्यांना पंतप्रधान मोदी यांना अश्लील, अपमानास्पद आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने दाखवणारे कथित मॉर्फ्ड व एआय-निर्मित व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळली. ( Hyderabad)



तक्रारीत या पोस्टमध्ये आक्षेपार्ह भाषा, उपहासात्मक मजकूर आणि अभद्र टिप्पण्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित सामग्री डिजिटलरीत्या संपादित करण्यात आली असून ती एआयच्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया खात्यांचे हँडलर्स यांना मुख्य आरोपी केले असून, मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास यांना दोन्ही प्रकरणांमध्ये सहआरोपी म्हणून नमूद केले आहे.



दरम्यान, या वादानंतर मेटाने भारत सरकारला पत्र पाठवून पंतप्रधानांसह इतर महत्त्वाच्या (व्हिआयपी) खात्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा खात्यांशी संबंधित संवेदनशील सामग्रीची तपासणी आणि पुनरावलोकन आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच कंटेंट रेग्युलेशन आणि इतर संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी मेटाचे वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.



याच पार्श्वभूमीवर, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनांदरम्यान आणि 20 जुलै रोजी आयोजित 'संसद चलो' मोर्चाच्या वेळी पंतप्रधानांविरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनीही कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना वादग्रस्त सामग्री हटविण्याच्या सूचना दिल्या असून, काही न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया खात्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (Hyderabad)

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,