kalyan Crime : २४ तासांपासून 'ती' बेपत्ता, काळा तलावात आढळला मृतदेह; ३२ सीसीटीव्ही बंद..., कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम येथील ऐतिहासिक प्रबोधनकार ठाकरे सरोवर (काळा तलाव) परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संचिता असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत. दरम्यान, तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न केला असता तलाव परिसरातील सर्व ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Kalyan)


मिळालेल्या माहितीनुसार, संचिता सोमवारी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.


मंगळवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास काळा तलावात एका तरुणीचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली असता तो बेपत्ता असलेल्या संचिताचा असल्याचे स्पष्ट झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. (Kalyan Police)



प्राथमिक माहितीनुसार, संचिताने तलावात उडी मारून आत्महत्या (Suicide) केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तिला कोणी तलावात ढकलले का किंवा मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.


विशेष म्हणजे, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे १९ कोटी रुपये खर्च करून काळा तलाव परिसराचा विकास करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात ३२ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, घटनेनंतर पोलीस फुटेज तपासण्यासाठी गेले असता सर्व कॅमेरे बंद असल्याचे आढळले. त्यामुळे तपासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, सीसीटीव्ही यंत्रणा बंद का होती, याचाही तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

Kishori Pednekar : महापालिका विरोधी पक्षनेत्या गोंधळलेल्या!

- पद टिकवण्यासाठी पेडणेकरांचा केविलवाणा प्रयत्न मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या शिस्तीमुळे नगरसेवक राहिले उपाशी

- सभागृहात उपहारगृह बंदीवरून तीव्र नाराजीचे उमटले सूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील उपहारगृहात

Rabies Injections : मुंबईत यापुढे एकही रुग्ण रेबीज इंजेक्शन नसल्याने परत जाणार नाही

- महापालिका प्रशासनाने सभागृहात दिली ग्वाही - भटके कुत्रे आणि त्यांच्या हल्ल्यामुळे प्रतिबंधित रेबीज उपलब्ध

BMC News : मुबईतील ओसी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांचा यातना संपणार

- स्थायी समितीनंतर महापालिका सभागृहातही प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत अनेक विकासकांनी

Pune Crime : नसरापूरची पुनरावृत्ती! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या; घराशेजारील तरुण संशयित ताब्यात

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला तरी 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस अद्याप राज्यात म्हणावा तसा झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून