Pakistan : पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, पाकिस्तानच्या जेन - झीची 'ही' मागणी ऐकून शरीफ यांची झोप उडाली ; पाकिस्तानात खळबळ

Pakistan : दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले, नीट पेपरफुटी विरोधात असलेले हे आंदोलन संपूर्ण जगाने पाहिले. दरम्यान, या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता जेन - झीचा. पाकिस्तानातील जेन - झी देखील या आंदोलनामुळे प्रेरित झाली असून पाकिस्तानात देखील आता कॉकरोच पार्टीचे आंदोलनही सुरू झाले आहे. भारतात ज्या प्रमाणे आधी कॉकरोच जनता पार्टी असे नाव देऊन इंस्टग्राम अकाउंट तयार करण्यात आले त्याचप्रमाणे पाकिस्तान मध्ये देखील कॉकरोच पार्टी या नावाचे इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट तयार करण्यात आले आहे. ज्यावर आता रिल्स आणि पार्टीच्या मागण्यांबद्दल पोस्ट केल्या जात आहे.


सिंध प्रांतातील हैदराबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीशी जोडण्यात आले आहे. जंतर-मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापासून प्रभावित झालेल्या सिंध हैदराबादच्या लोकांनी आपल्या आंदोलनाला कॉकरोच पार्टी ऑफ पाकिस्तान असे म्हटले आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) कॉकरोच पार्टी पाकिस्तानचा उदय होताच लाखो पाकिस्तानी तरुण या आंदोलनाशी जोडले गेले आहेत.



आम्हालाही आंदोलन करायचे आहे पण...


पाकिस्तानच्या जेन-जीचे म्हणणे आहे की, आम्हाला पाकिस्तानमध्येही जंतर-मंतरसारखे आंदोलन करायचे आहे, पण असे केले तर बाहेर जीप येईल. सरकारविरुद्ध आंदोलन केले तर पाकिस्तान आर्मी उचलून नेईल. अशी भीती तरुणाईमध्ये आहे. अनेक विद्यार्थ्यांनी थेट पाकिस्तानच्या सेना प्रमुख आसिम मुनीर यांचे फोटो लावले आहेत आणि म्हटले आहे की, त्यांच्या भीतीमुळे आंदोलन होऊ शकत नाही. तरुण रील्समधून हा संदेश देत आहे की, पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचे लोकशाही प्रदर्शन सेना आणि आयएसआयच्या निशाण्यावर येईल.



पाकिस्तानच्या जेन - झीची मागणी काय ?


२०२४ मध्ये सिंध पब्लिक सर्व्हिस कमिशनने आयोजित केलेल्या परीक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाकिस्तानच्या इतर संस्थांप्रमाणेच एसपीएससीवरही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. प्रकरण चिघळल्यावर सिंध हायकोर्टाने मे महिन्यात परीक्षेच्या निकालावर स्थगिती दिली होती. तरुणांच्या आरोपानुसार परीक्षेच्या निकालात सिंधच्या स्थानिक तरुणांसोबत भेदभाव करण्यात आला. या प्रकरणाविरुद्ध सिंध स्टुडंट अॅक्शन कमिटीने सिंध पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या कार्यालयाबाहेर तंबू ठोकला आहे. सिंधचे तरुण म्हणत आहेत की, नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. सिंध भागात प्रदर्शन वाढत आहे आणि तरुण भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईसोबत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल.

Comments
Add Comment

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक