Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया संदर्भात नवे नियम लागू; नियम मोडल्यास होणार कारवाई

मुंबई : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन (online) वर्तनाबाबत वाढलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



ही नियमावली राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी व बाह्यस्रोतावरील कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे आणि मंडळांमधील कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असेल. अलीकडील विविध आंदोलनांदरम्यान सोशल मीडियावर झालेल्या पोस्ट, प्रतिक्रिया आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.नव्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या धोरणांवर, निर्णयांवर अथवा राजकीय घडामोडींवर सोशल मीडियाद्वारे प्रतिकूल टिप्पणी, टीका किंवा मतप्रदर्शन करता येणार नाही. तसेच समाजात तेढ निर्माण करणारे, द्वेषमूलक, मानहानीकारक किंवा आक्षेपार्ह स्वरूपाचे कोणतेही पोस्ट, कमेंट, फॉरवर्ड किंवा शेअर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.


सरकारने वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती पूर्णपणे वेगळी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वैयक्तिक खात्यावर शासकीय पदनाम, विभागाचा लोगो(logo), गणवेश, सरकारी वाहन, कार्यालय किंवा इमारतीचा वापर करून फोटो, व्हिडिओ(video) किंवा रिल्स(reels) पोस्ट करता येणार नाहीत. तसेच सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे किंवा संवेदनशील माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.मात्र, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार, कार्यालयीन समन्वय आणि अधिकृत संवादासाठी व्हॉट्सॲप(WhatsApp), टेलिग्रामसारख्या(telegram) मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर केंद्र किंवा राज्य सरकारने बंदी घातलेल्या कोणत्याही संकेतस्थळांचा किंवा ॲप्सचा वापर कर्मचाऱ्यांना करता येणार नाही.सरकारने स्पष्ट केले आहे की, 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९' हे सोशल मीडियावरील वर्तनालाही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' अंतर्गत कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात