शाळा-कॉलेजशी दूरचा संबंध नसलेल्यांची घुसखोरी
मुंबई : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा (Protest) राजकीय फायदा उठवण्यासाठी काही पक्षांचे कार्यकर्ते आणि गुंड आंदोलनात घुसून हुल्लडबाजी करत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. "आंदोलनात सहभागी असलेल्या खऱ्या विद्यार्थ्यांबाबत गृहखाते नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल. मात्र, पोलिसांवर (Police) दगडफेक (Stone Pelting) करणारे, वाहनांची तोडफोड करणारे आणि दंगा-मस्ती करणाऱ्या उपद्रवी घटकांना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका," अशी भूमिका महाजन यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.
महाजन म्हणाले की, "काही राजकीय पक्षांकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे हाच या घुसखोरांचा मुख्य हेतू होता. त्यामुळे अशा हुल्लडबाजांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे."
मुंबई : बारावीतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते ...
या वेळी गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. "राजकारणात आपण कुठेतरी थांबले पाहिजे. स्मशानात जाईपर्यंत मीच; उठायला जमत नाही, बसायला जमत नाही, तरीही सर्व ठिकाणी 'मीच' ही भूमिका जनतेला अजिबात आवडत नाही. प्रत्येकाने योग्य वेळी थांबणे गरजेचे असते," असा सल्ला त्यांनी खडसेंना दिला.
राजकारणातून निवृत्तीचे संकेत
आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना महाजन यांनी आगामी काळात निवृत्तीचे संकेतही दिले. आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक करताना ते म्हणाले, "मंगेश चव्हाण यांना पहिल्यांदा उमेदवारी देताना मी माझी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आज त्यांनी सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. माझ्या सलग सात वेळा निवडून येण्याचा विक्रम ते नक्कीच मोडतील. आम्ही आता आणखी किती दिवस राहणार, एखादी टर्म अजून होऊ शकते," असे म्हणत त्यांनी नवीन नेतृत्वाला वाव देण्याची गरज व्यक्त केली.





