Industrial Production : देशाचे औद्योगिक उत्पादन जूनमध्ये 7.3 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरून दिलासादायक बातमी आहे. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि वीज तसेच गॅस पुरवठा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे जून महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन 7.3 टक्क्यांनी वाढले आहे. यापूर्वी मे महिन्यात हा वाढीचा दर 5.1 टक्के होता. त्याच्या तुलनेत जूनमधील वाढ लक्षणीयरीत्या अधिक आहे. ( Industrial Production)


सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) आधारित औद्योगिक उत्पादनात वार्षिक आधारावर 7.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीत उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील 7.8 टक्के आणि वीज क्षेत्रातील 10.6 टक्के वाढीचा मुख्य वाटा आहे. ( India Industrial Growth)



राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जून 2026 साठी आयआयपीचा वाढीचा दर 7.3 टक्के असून, मे 2026 मधील 5.1 टक्के (जूनमध्ये जारी केलेला तात्पुरता अंदाज) या तुलनेत अधिक आहे. मे महिन्यासाठी आयआयपीचा सुधारित अंदाज 5 टक्के आहे. नव्या मालिकेवर आधारित औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) ची ही तिसरी मासिक आकडेवारी आहे.” ( Economic Growth)


आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर तुलना केल्यास जूनमध्ये खाण आणि संबंधित क्षेत्रातील उत्पादनात 1 टक्का, उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात 7.8 टक्के, तर वीज आणि गॅस पुरवठा तसेच जलपुरवठा क्षेत्रातील उत्पादनात 10.6 टक्के आणि सांडपाणी व कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील उत्पादनात 6.1 टक्के वाढ झाली. तसेच उत्पादन क्षेत्रातील 23 उद्योग गटांपैकी 19 गटांनी जून 2025 च्या तुलनेत जून 2026 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली.


मंत्रालयाच्या माहितीनुसार, जून 2026 मध्ये सर्वाधिक सकारात्मक योगदान देणाऱ्या पहिल्या तीन क्षेत्रांमध्ये विद्युत उपकरणांचे उत्पादन (34 टक्के) अग्रस्थानी राहिले. याशिवाय मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलर उत्पादन (17.5 टक्के) तसेच अन्न उत्पादनांचे उत्पादन (10.8 टक्के) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक