Sharad Pawar : पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट

- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बैठक?; मोदींच्या भेटीनंतर सूत्रे हलल्याची चर्चा


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार (Parth Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या हालचालींना पुन्हा वेग आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून शरद पवारांच्या पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊनच ‘एनडीए’त सामील व्हावे, अशी अट ठेवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या विलीनीकरणाला पक्षांतर्गत विरोध असल्याचीही चर्चा सुरू आहे.


या सर्व घडामोडींदरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) घेतलेल्या भेटीला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तटकरे यांनी या भेटीवर भाष्य करण्याचे टाळले असले, तरी वरिष्ठ नेत्यांच्या या लागोपाठ सुरू असलेल्या बैठकांमुळे विलीनीकरणाची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचा कयास बांधला जात आहे.



सुप्रिया सुळे अमित शाहांना का भेटल्या?


या घडामोडींसोबतच १० ऑगस्ट रोजी दिल्लीत होणारा रेवती सुळे (Revati Sule) आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळाही राजकीयदृष्ट्या चर्चेत आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. शरद पवारांच्या ६ जनपथ या दिल्लीतील निवासस्थानी होणाऱ्या या सोहळ्याला (Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह सोनिया गांधी व राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार असून भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे या भेटीगाठींकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक