Preity Zinta : 9 वर्षांनंतर प्रीती झिंटाचे दमदार कमबॅक; 'या' आगामी चित्रपटात झळकणार

मुंबई : बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिच्या आगामी 'बटवारा 1947'  (Batwara 1947) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक वर्षांनंतर प्रीतीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.


1990 आणि 2000 च्या दशकात प्रीती झिंटाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. 'दिल से', 'सोल्जर', 'कल हो ना हो', 'कोई... मिल गया', 'वीर-झारा' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र 2016 मध्ये अमेरिकन नागरिक जीन गुडइनफ यांच्याशी विवाह केल्यानंतर तिने अभिनयातून काही काळ विश्रांती घेत वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले. (Bollywood)



29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिस येथे प्रीती आणि जीन गुडइनफ यांचा विवाह झाला. जीन हे व्यवसायाने फायनान्शियल अॅनालिस्ट आहेत. लग्नानंतर प्रीती अमेरिकेत स्थायिक झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई झाली. जय आणि जिया अशी तिच्या मुलांची नावे आहेत. अभिनयापासून दूर असली तरी क्रिकेट आणि इतर व्यावसायिक कारणांमुळे ती भारतात येत असते. (New Movie)



बटवारा 1947 या चित्रपटातून प्रीतीचा कमबॅक


आता 'बटवारा 1947' या चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले असून, 14 ऑगस्ट 2026 रोजी 'विभाजन दिना'च्या निमित्ताने हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Hindi Movies)



1947 मधील भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट एका कुटुंबाची कथा सांगतो. हिंसा, भीती आणि सक्तीच्या स्थलांतरामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये फाळणीची वेदना आणि कठीण परिस्थितीतही जपली गेलेली माणुसकी प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. (New Movie)


या चित्रपटात प्रीती झिंटासोबत शबाना आझमी, सनी देओल, करण देओल, अली फझल आणि अभिमन्यू सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरनंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून, प्रीती झिंटाच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. ( Batwara 1947)




Comments
Add Comment

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं