Nitesh Rane : 'गज्वा-ए-हिंद'चे प्रयत्न करणाऱ्यांना मोदी सरकार सोडणार नाही!

 मंत्री नितेश राणे यांचा इशारा; 'सर तन से जुदा', 'अल्ला हू अकबर'चा 'नीट'शी काय संबंध?


मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'विषयी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशात ‘गज्वा-ए-हिंद’ घडवण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात असल्याचा आरोप मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. "विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मातीत मिळवून टाकू. पाकिस्तान किंवा मध्य पूर्वेतील देशांमध्ये बसून भारताविरोधात कट रचणाऱ्या एकालाही केंद्र व राज्य सरकार सोडणार नाही," असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.


 



 


महाराष्ट्र सायबर विभागाने 'नीट' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चालवल्या जाणाऱ्या ५०० हून अधिक संशयित आणि परदेशी सोशल मीडिया अकाऊंट्सचा पर्दाफाश केल्यानंतर नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर आणि असामाजिक घटकांवर जोरदार निशाणा साधला. राणे म्हणाले, "महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की जिहादी घटकांना या आंदोलनाच्या आडून 'गज्वा-ए-हिंद'चे उद्दिष्ट गाठायचे होते. जर हे आंदोलन 'नीट' परीक्षेबाबत होते, तर मग तिथे 'सर तन से जुदा'च्या घोषणा का दिल्या गेल्या? आमच्या हिंदू-सनातन धर्माला आणि देवी-देवतांना शिवीगाळ का करण्यात आली? 'सर तन से जुदा' किंवा 'अल्ला हू अकबर' या घोषणांचा 'नीट' परीक्षेशी काय संबंध आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली असून त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. मात्र आंदोलनाच्या नावाखाली देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



विरोधकांच्या मौनावर टीका


शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झालेल्या राजकीय नेत्यांवर टीका करताना राणे म्हणाले, "त्या मंचावर सनातन हिंदू धर्माचा अपमान केला जात असताना एकही नेता त्याविरोधात बोलला नाही. हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणाऱ्या नेत्यांचे हे कृत्य नक्कीच समर्थनार्ह नाही. पाकिस्तानच्या भूमीवरून किंवा इतर देशांतून भारताची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हुडकून काढून कडक कारवाई केली जाईल", असा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक