ISSF World Cup : चिनी खेळाडूला धूळ चारत ईशा सिंगने जिंकले सुवर्णपदक; कोण आहे इशा सिंग ? मनू भाकरला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

हांगझोऊ : जागतिक क्रीडा जगतात भारतीय नेमांबाजांनी पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी भरतील खेळाडूंनी शानदार कामगिरी करत दुहेरी पदकाची कामे केली. २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताची २१ वर्षांची युवा स्टार खेळाडू ईशा सिंग (Isha Singh)  हिने अप्रतिम अचूकता दाखवत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. या अत्यंत चुरशीच्या लढतीत तिने ऑलिम्पिक पदक विजेती स्टार खेळाडू मनू भाकरलाही मागे टाकले.



अंतिम फेरीत दबावाचा सामना करत ४० अचूक हिट्स


स्पर्धेच्या फायनल फेरीत प्रचंड दबावाचे वातावरण होते. मात्र, ईशा सिंगने कमालीचा संयम आणि एकाग्रता दाखवत ५० पैकी तब्बल ४० शॉट्स अचूक मारले. स्थानिक खेळाडू असलेल्या चीनच्या यू झांगचा पराभव करत ईशाने अव्वल स्थान पटकावले. याच स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मनू भाकर तिसऱ्या स्थानावर राहिली, ज्यामुळे तिला कांस्यपदकावर (Bronze Medal) समाधान मानावे लागले.



माजी रॅली ड्रायव्हरच्या लेकीनं १० व्या वर्षी उचलली बंदूक


ईशा सिंगचा जन्म १ जानेवारी २००५ रोजी हैदराबाद येथे झाला. तिला बालपणापासूनच खेळांची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळात तिने गो-कार्टिंग, टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये नशीब आजमावले. मात्र, वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी तिने नेमबाजी (Shooting) क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. तिचे वडील सचिन सिंग हे स्वतः एक माजी रॅली ड्रायव्हर आहेत. मुलीची खेळातील आवड ओळखून तिच्या वडिलांनी सुरुवातीला घरातच सरावासाठी टार्गेट बोर्ड तयार करून दिला होता.



गगन नारंग यांच्या अकादमीतून सुरू झाला सुवर्णप्रवास


घरातील प्राथमिक सरावानंतर ईशाचे कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला ऑलिम्पिक पदक विजेते गगन नारंग यांच्या शूटिंग अकादमीमध्ये दाखल केले. तेथे मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे तिच्या खेळात कमालीचा निखार आला. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.



आशियाई खेळ, जागतिक विक्रम अन् 'अर्जुन पुरस्कारा'ची मोहर


ईशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचे सातत्य कायम ठेवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) तिने सुवर्णपदकासह एकूण ४ पदके जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. म्युनिक येथील स्पर्धेत ४३ गुण मिळवून तिने नवीन जागतिक विक्रम (World Record) प्रस्थापित केला होता. तिच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने तिला क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित 'अर्जुन अवॉर्ड' देऊन सन्मानित केले आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अनेक जागतिक पदके आपल्या नावावर करणाऱ्या ईशा सिंगवर सध्या संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला