Ambernath Crime : अंबरनाथमध्ये संतापजनक प्रकार; 12 व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून हत्या, CCTV फुटेज व्हायरल

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. रॉयल फ्लोरा या इमारतीच्या ए विंगमध्ये एका व्यक्तीने १२ व्या मजल्यावरून फिरत असलेल्या मांजरीला मुद्दाम खाली ढकलल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.




रविवारी (२६ जुलै) सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती दबक्या पावलांनी डक्टजवळ येताना दिसतो. त्यानंतर तो मांजरीला खाली ढकलतो आणि ती खाली पडल्याची खात्री करण्यासाठी वाकून पाहतो. त्यानंतर तो तेथून शांतपणे निघून जातो. या घटनेत मांजरीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीविरोधात प्राण्यांवरील क्रूरतेच्या आरोपाखाली कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आता प्राणी संरक्षण कायद्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे .मात्र या व्यक्तीने मांजरीला का ढकललं? मांजरीला १२ व्या मजल्यावरून ढकलण्यामागचं कारण नेमक काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना