Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.



बैठकीत सागरी आणि भूजलशाही मच्छीमारांसाठी दोन स्वतंत्र कल्याणकारी महामंडळांची स्थापना, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती, निधीची उपलब्धता तसेच महामंडळांच्या कार्यक्षम अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, महामंडळाच्या कार्यालयासाठी महानंदाच्या जागेवर कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली.



मच्छीमारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



या बैठकीस मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव, सहआयुक्त (सागरी), सहआयुक्त (भूजल) तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे