Amazon Great Freedom Sale 2026 : स्वातंत्र्यदिनानिमित्त Amazon ची मोठी ऑफर! ७ ऑगस्टपासून फ्रीडम सेल सुरू; पाहा काय असणार खास ?

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अ‍ॅमेझॉन'ने (Amazon) आपल्या भारतीय ग्राहकांसाठी वर्षातील सर्वात मोठ्या सेलची घोषणा केली आहे. येत्या ७ ऑगस्टपासून 'अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल' (Amazon Great Freedom Sale) सुरू होत आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, किंवा गृहोपयोगी वस्तू (Home Appliances) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी हक्काची संधी ठरणार आहे.



प्राइम मेंबर्ससाठी विशेष सवलत?


अ‍ॅमेझॉनचा हा स्वातंत्र्यदिन विशेष वार्षिक सेल ७ ऑगस्टपासून लाइव्ह होणार आहे. मात्र, हा सेल किती दिवस चालणार याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. दरवेळेप्रमाणे यंदाही 'अ‍ॅमेझॉन प्राइम' (Amazon Prime) सदस्यांना नेहमीच्या ग्राहकांपेक्षा २४ तास आधीच (Early Access) या सेलचा लाभ घेण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या सेलदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून ते कपड्यांपर्यंत विविध कॅटेगिरीवर मोठी सूट दिली जाणार आहे.



१०% थेट डिस्काउंट आणि ईएमआयची सुविधा


ग्राहकांची बचत अधिक वाढवण्यासाठी अ‍ॅमेझॉनने बँकांसोबत विशेष करार केले आहेत. या सेलमध्ये 'एचडीएफसी' (HDFC) बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईजी ईएमआय (Easy EMI) व्यवहारांवर ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट (Instant Discount) मिळणार आहे. याशिवाय, 'अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय' (Amazon Pay ICICI) क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ५ टक्क्यांपर्यंत अनलिमिटेड कॅशबॅकची संधी उपलब्ध असेल. महागड्या वस्तूंसाठी 'नो-कॉस्ट ईएमआय' (No-Cost EMI) आणि जुन्या वस्तूंच्या बदल्यात 'एक्सचेंज ऑफर्स'चा (Exchange Offers) फायदाही घेता येईल.



रात्री ८ वाजता खास 'लिमिटेड पीरियड डील्स' आणि डिस्काउंट कूपन्स!


या सेलचे मुख्य आकर्षण म्हणजे कंपनी दररोज रात्री ८ वाजता खास 'लिमिटेड पीरियड डील्स' (Limited Period Deals) सादर करणार आहे. त्याशिवाय 'ब्लॉकबस्टर डील्स', 'ट्रेंडिंग डील्स' आणि विशेष 'एक्सचेंज मेला'चे आयोजन केले जाईल. 'बाय मोअर, सेव मोअर' (Buy More, Save More), 'अ‍ॅमेझॉन कूपन्स' आणि गिफ्ट कार्ड्सवर १० टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त सवलतींमुळे ग्राहकांना अगदी अल्प दरात वस्तू खरेदी करता येतील. कोणत्या विशिष्ट स्मार्टफोन्स आणि गॅझेट्सवर किती रुपयांची सूट असेल, याचा उलगडा सेल सुरू होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर केला जाईल.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र