Nitesh Rane : 'नीट'च्या आंदोलनाआडून 'गज्वा-ए-हिंद'चा प्रयत्न?

मंत्री नितेश राणे यांचा सवाल; महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी 'डीपफेक'चा वापर


मुंबई : कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी देशाबाहेरून मोठे षड्यंत्र रचले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या आंदोलनांच्या आडून ‘गज्वा-ए-हिंद’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावरून उपस्थित केला आहे. दुसरीकडे, जनमानसात भ्रम निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ५०० हून अधिक संशयित सोशल मीडिया अकाऊंट्सची ओळख महाराष्ट्र सायबर विभागाने पटवली असून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.(Nitesh Rane)






महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा धोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपप्रचार केला जात असल्याची माहिती सायबर विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या तपासासाठी ‘ओपन-सोर्स इंटेलिजन्स’ (OSINT), डेटा मेटाडेटा विश्लेषण आणि अत्याधुनिक एआय फॉरेन्सिक उपकरणांचा वापर करण्यात आला. या विश्लेषणादरम्यान, विशिष्ट उद्देशाने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याच्या हेतूने चालवले जाणारे एक संघटित नेटवर्क सायबर पोलिसांच्या हाती लागले आहे.



तांत्रिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, या अपप्रचाराची सूत्रे प्रामुख्याने भारताबाहेरून हलवली जात होती. ओळख पटवलेल्या ५०० हून अधिक संशयित अकाऊंट्सपैकी १०० हून अधिक सोशल मीडिया हँडल्स हे पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील काही देशांमधून चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. या नेटवर्कद्वारे चालवल्या जाणाऱ्या ४२९ अति-आक्षेपार्ह पोस्ट्स इंस्टाग्राम, एक्स, फेसबुक आणि यूट्यूबवरून हटवण्यासाठी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.



तपासात काय समोर आले?

- या अकाऊंटवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या कंटेंटमध्ये १४० हून अधिक पोस्ट्स आणि प्रोफाईल्स या पूर्णपणे एआय-जनरेटेड किंवा डीपफेक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या होत्या. तपासादरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्षात नसलेली प्रचंड गर्दी दाखवण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे तयार केलेले व्हिडिओ वापरणे, लोकप्रतिनिधींचे बनावट आवाज (Clone Audio) तयार करून दिशाभूल करणे आणि नेत्यांच्या वक्तव्यांचे संदर्भ बदलून एडिटेड व्हिडिओ पसरवणे असे प्रकार समोर आले आहेत.
- दरम्यान, सोशल मीडियावरील कोणत्याही पडताळणी न केलेल्या व्हिडिओंवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि असा संशयास्पद मजकूर फॉरवर्ड करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर करून देशांतर्गत शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Dnyaneshwari Yadav : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक ग्लासगो :युवा

SIR : 'एसआयआर' प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

१७ ऑगस्टला प्रारूप यादी; १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोंदणीची मुदत मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार

Lok Sabha : लोकसभेचे कामकाज पुन्हा स्थगित, सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांचा गदारोळ

नवी दिल्ली : संसदेच्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Bank of Baroda : 'बँक ऑफ बडोदा'च्या एक टीबी डेटाची चोरी; ग्राहकांची माहिती, वैयक्तिक तपशील आणि कागदपत्रे डार्क वेबवर उपलब्ध

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक अग्रेसर आणि महत्त्वाची बँक असलेल्या 'बँक ऑफ बडोदा'चा (Bank of Baroda)तब्बल १