Gold Smuggling : देशभरात विशेष मोहिमेत तस्करांनी आणलेले 27 किलो सोने जप्त, 12 जणांना अटक

नवी दिल्ली : सोन्याची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांच्या जाळ्याविरोधातील आपली मोहीम तीव्र करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात गुप्त माहितीच्या आधारे अनेक कारवाया केल्या आहेत. यामध्ये विदेशी बनावटीचे तस्करी करून आणलेले 27 किलोपेक्षा जास्त सोने जप्त करण्यात आले असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांदरम्यान विमानातील शौचकूप, वाहने व भांड्यांमध्ये बनवलेले विशेष कप्पे आणि शरीरात सोने लपवण्यासारख्या अत्याधुनिक पद्धती उघडकीस आल्या आहेत.



गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 23-24 जुलै रोजी अदीस अबाबा येथून आलेल्या 3 प्रवाशांना रोखले. विमानाची कसून तपासणी केली असता, मागच्या टॉयलेटच्या छताच्या पॅनेलमध्ये लपवलेल्या सुमारे 12 किलो वजनाच्या विदेशी सोन्याच्या 6 लगडी सापडल्या. विमानतळ कर्मचाऱ्यांमार्फत हे सोने नंतर बाहेर काढले जाणार होते, असे चौकशीत आढळले. सोने जप्त करून तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.23.07.2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआय अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुत्रा मेलने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला उत्तर प्रदेशात पकडले. तिच्या कमरेचा पट्टा आणि हँडबॅगमधून सुमारे 5 किलो वजनाच्या विदेशी सोन्याच्या 42 लगडी जप्त करण्यात आल्या. हे सोने बांगलादेशमार्गे भारतात आणल्याचे तिने कबूल केले. हे सोने जप्त करण्यात आले आणि या प्रवासी महिलेला अटक करण्यात आली.गुप्तचरांनी दिलेल्या आणखी एका माहितीच्या आधारे मुंबई विमानतळावर 22-23 जुलै दरम्यान केलेल्या दुसऱ्या एका कारवाईत, विमानातील शौचालयात मेणाच्या रूपात सोन्याची भुकटी लपवून तस्करी करणाऱ्या टोळीची कार्यपद्धती उघडकीला आणली. हे सोने सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले जात होते. या कारवाईत 3.7 किलो सोने जप्त करून मुख्य वाहक, सफाई कर्मचारी, हँडलर आणि खरेदीदारासह 5 जणांना अटक करण्यात आली. (Gold Smuggling)



१९ जुलै २०२६ रोजी, कोलकाता रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडून 4.6 किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले, जे खास तयार केलेल्या भांड्यांमध्ये लपवले होते. हे सोने म्यानमारमार्गे भारतात आणले गेले असल्याचे चौकशीत उघड झाले. हे सोने जप्त करण्यात आले आणि या प्रवाशाला अटक करण्यात आली.आठवड्याभरात, इतर दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये, कोची आणि गुवाहाटी येथील डीआरआय अधिकाऱ्यांनी सुमारे 2 किलो विदेशी सोने जप्त केले. कोची विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या शरीरात लपवून आणलेले सोने जप्त करण्यात आले, तर गुवाहाटी येथे एका कारमध्ये विशेष प्रकारे बनवलेल्या गुप्त कप्प्यात लपवलेल्या सोन्याच्या बिस्किटांची जप्ती करण्यात आली. या कारवायांमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे