Maharashtra Monsoon Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

- कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन


मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यामुळे तसेच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Monsoon Update)


विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियामध्ये धान लागवडीची कामे वेगाने सुरू असून शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत घेत आहेत. धान लागवडीसाठी महिला मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाल्याने ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. (Maharashtra Monsoon Update)


याउलट अकोला जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्याप बाकी आहे. पावसाची २२ टक्के तूट असल्याने धरणांमधील पाणीसाठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता वाढली आहे. उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार अल्पकालीन पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (Maharashtra Monsoon Update)



अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत असल्याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वातावरणातील बदल, मान्सूनच्या प्रणालीतील चढ-उतार, एल निनो आणि ला निना यांसारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या