Hair Loss : तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? कमी वयातच केस पातळ होतायत ?

जाणून घ्या महिला आणि पुरुषांमधील केस गळतीची मुख्य कारणे व उपाय!


सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही केस गळतीची (Hair Loss) समस्या वेगाने वाढली आहे. अगदी कमी वयातच केस गळून पातळ होत असल्याने अनेक जण चिंतेत आहेत. जाणून घ्या केस गळतीची प्रमुख कारणे आणि त्यावर करायच्या उपाययोजनांबाबत महत्त्वाची माहिती...



पुरुष आणि महिलांमधील केस गळतीची कारणे:


पुरुषांमधील केस गळतीची मुख्य कारणे: पुरुषांमध्ये केस गळतीची मुख्य समस्या ही आनुवंशिकता असते. घरातील वडील, काका, मामा किंवा आजोबांना टक्कल पडले असेल, तर पुढच्या पिढीला हा त्रास होऊ शकतो. अनेकदा कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही ही समस्या उद्भवू शकते.


महिलांमधील केस गळतीची मुख्य कारणे: महिलांमध्ये पचनाच्या समस्या, हार्मोन्सचे असंतुलन (Hormonal Imbalance) आणि वाढता मानसिक तणाव ही केस गळतीची प्रमुख कारणे आहेत.


केस गळतीची इतर सामान्य कारणे: हवेतील धुळीचे सूक्ष्मकण, डोक्याच्या त्वचेवर किंवा केसांमध्ये इन्फेक्शन असणे, केमिकलयुक्त उत्पादने वापरणे किंवा हेअर कलर/प्रॉडक्ट्सची ॲलर्जी असल्यामुळेही स्त्री-पुरुष दोघांमध्येही केस गळतीची समस्या उद्भवू शकते.



महत्त्वाचे उपाय:


पौष्टिक आहार: केस गळती रोखण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि सर्व पोषक घटकांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेरील अन्नपदार्थ (Junk Food) खाणे बंद करावे. जंक फूड टाळावे.


योग्य शाम्पूची निवड: स्वतःच्या मनाने कोणतेही प्रॉडक्ट वापरण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य शाम्पू वापरावा.


केसांना तेल लावणे टाळा: डॉक्टरांच्या मते, समस्या वाढली असल्यास केसांना तेल लावणे टाळावे. तसेच केमिकलयुक्त हेअर कलर व इतर प्रॉडक्ट्सचा वापर टाळल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.


टीप: आनुवंशिक कारणांमुळे होणारी केस गळती पूर्णपणे थांबवणे कठीण असले, तरी योग्य काळजी आणि वेळीच केलेल्या उपायांमुळे त्याचे प्रमाण नक्कीच कमी करता येते.

Comments
Add Comment

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Weekend Vibes : या विकेंडला बाहेर जायचा कंटाळा आलाय ? काहीतरी वेगळं करायचं आहे ? मग या गोष्टी नक्की ट्राय करून बघा

मुंबई : आठवडाभर कामाच्या धावपळीनंतर वीकेंडला आराम करावासा वाटतो. पण दरवेळी बाहेर फिरणे, मॉलमध्ये जाणे किंवा

बूथ पातळीवर संघटन मजबूतीबरोबरच कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचना

पक्षाकडून प्रत्येक विषय दिला जाईल आणि त्यावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करायचे आहे, अशा

Nashik : सिंहस्थासाठी गोदावरी स्वच्छ, प्रदूषणमुक्त ठेवण्यावर भर; घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे आतापासूनच नियोजन करा - मंत्री पंकजा मुंडे

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) देश-विदेशातून मोठ्या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Waste to Best : मक्याच्या टाकाऊ सालींपासून बनवा घरासाठी 'या' अप्रतिम वस्तू; स्मार्ट गृहिणींचा हा भन्नाट जुगाड

Waste to Best : पावसाळ्यात प्रत्येकाला मक्याचे कणीस खायला आवडते. बाजारातून आई सुध्दा मक्के आणत असते. पण मका खाल्ल्यानंतर,