Sonam Wangchuk Fast : 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण; हिंसाचार टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Sonam Wangchuk Fast : सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी 26 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे. दीर्घ चर्चेनंतर आणि देशात कोणताही तणाव किंवा हिंसाचार निर्माण होऊ नये, याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी उपोषण सोडले. यावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (JP Nadda,), डॉ. जितेंद्र सिंह, लेह-लडाख एपेक्स बॉडीचे प्रतिनिधी तसेच त्यांच्या पत्नी गीतांजली उपस्थित होत्या.

एक्सवरून शेअर केली माहिती


उपोषण संपल्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून पहिली प्रतिक्रिया दिली. रुग्णालयातील बेडवरून त्यांनी एक छायाचित्रही शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी 26 दिवसांनंतर उपोषण संपवल्याची माहिती देत, हा निर्णय अनेक स्तरांवर चर्चा झाल्यानंतर घेतल्याचे स्पष्ट केले. ( Sonam Wangchuk Fast)




वांगचुक यांनी सांगितले की, विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती किंवा उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्या पत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. विविध अटींवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपोषण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेदरम्यान नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर सहमती झाली, याबाबतची माहिती आपण लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तोपर्यंत देशभरात शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. (NEET Paper Leak)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया


सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही X वरून प्रतिक्रिया दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, नियमित दिनचर्या पाळावी आणि पूर्वीप्रमाणे उत्तम आरोग्य व वजन पुन्हा मिळवावे, अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली.


NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar Protest) येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. 'सोनम सर' म्हणून ओळखले जाणारे वांगचुक या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनले होते. 18 जुलै रोजी त्यांना जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रथम सफदरजंग रुग्णालयात आणि नंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण कायम ठेवले होते. अखेर 26 दिवसांनंतर त्यांनी आपले बेमुदत उपोषण संपवले.

 

 



Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या