Weight Loss करायचा आहे ? मग काय उत्तम भाकरी, भात की चपाती ? वजन कमी करायला काय करावं ? असा प्रश्न अनेकांना पडतो.
वजन कमी करायचंय म्हणून बरेच जण भात बंद करतात आणि फक्त चपाती (पोळी) खातात. पण हे बरोबर आहे का? भात आणि चपाती दोन्हीत कार्बोहायड्रेट (कर्बोदके) आहेत. फरक फक्त किती आणि कसे खातो यात आहे.
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील ४७ ...
भारतात भात आणि चपाती हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणात खाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. वजन कमी करण्यासाठी भात आणि चपाती यापैकी काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी मतमतांतरे आहेत. कारण तांदुळाचा भात पटकन पचतो, पोट हलकं राहतं, पण जास्त खाल्ला तर calories वाढतात. याच कारणामुळे ब्राऊन राईस किंवा कमी प्रमाणात पांढरा भात खावा असे आहारतज्ज्ञ सांगतात. चपाती अर्थात गव्हाच्या पोळीत Fiber जास्त असतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. गहू + मल्टीग्रेन चपाती weight loss साठी चांगला option पण तेल-तूप लावून 4-5 चपाती खाल्ल्या तर फायदा होणार नाही, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक रायफल/पिस्तूल/शॉटगन स्पर्धेत शानदार कामगिरी करत महिला 10 ...
भात किंवा चपाती कोणताही पदार्थ पूर्ण बंद करू नका. प्रमाण नियंत्रित ठेवा. आठवड्यातून 3-4 वेळा एका वाटी भात + भरपूर भाजी/डाळ घेऊ शकता आणि चपाती खाताना दोन पेक्षा जास्त नको. यासोबतच डाळी, कडधान्य, भाजी आणि सॅलड यांचाही रोजच्या आहारात समावेश करावा; असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर ठाणे ते कल्याण दरम्यान ...
दुपारचं जेवण कसं असावं ?
वजन कमी करायचं असल्यास दुपारच्या जेवणामध्ये भाजी, सॅलड आणि प्रोटीन असणे आवश्यक आहे. प्रोटीनमध्ये तुम्ही डाळी कडधान्य यांचा समावेश करू शकता किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन यांचा सुद्धा समावेश करू शकता, असे आहारतज्ज्ञ सुचवतात. जेवणाचं ताट असं असेल तर तुमचं वजन कमी राहील तसेच आरोग्य देखील उत्तम राहील. योग्य प्रमाणात आहार घेतल्यास पोळी आणि भातानेही वजन वाढणार नाही. तुम्ही आहारातून भात आणि पोळी पूर्णपणे कमी केल्यास चिडचिड होणे, मूड स्विंग होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भात आणि पोळी आहारातून पूर्णपणे बंद करू नये. जेवताना शांतपणे प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. टीव्ही वा मोबाईल बघत जेवण घेणे टाळावे.