WTC Final 2027 चे वेळापत्रक जाहीर! 'द ओव्हल'वर रंगणार अंतिम सामना; गुणतालिकेत भारताची घसरण

- ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमध्ये होणार अंतिम लढत; ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानावर


मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) २०२५-२७ हंगामाच्या अंतिम सामन्याची तारीख आणि स्थळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहे. ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमधील 'द ओव्हल' मैदानावर WTC फायनल खेळवली जाणार आहे. यापूर्वी २०२३ मध्ये याच मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. (WTC Final 2027)


आयसीसीने यापूर्वीच २०२७, २०२९ आणि २०३१ या तीनही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या इंग्लंडमध्येच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा WTC फायनल इंग्लंडमध्ये रंगणार आहे. (WTC Final 2027)



गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानी :


सध्या सुरू असलेल्या WTC २०२५-२७ चक्रातील गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. नियमांनुसार गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात. (WTC Final 2027)



सध्याची आघाडी अशी आहे:


१. ऑस्ट्रेलिया
२. दक्षिण आफ्रिका
३. न्यूझीलंड
४. बांगलादेश
५. भारत


भारताची पाचव्या स्थानावरील घसरण ही संघासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.



टीम इंडियासमोर मोठे आव्हान :


भारताने आतापर्यंत दोन वेळा (२०२१ आणि २०२३) WTC फायनल गाठली असली तरी एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. दरम्यान, कसोटी संघात मोठे बदल झाले असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे नव्या संघासमोर WTC फायनल गाठण्याचे मोठे आव्हान आहे. (WTC Final 2027)


भारताचे अजून ९ कसोटी सामने बाकी असून अंतिम फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी त्यापैकी किमान ८ सामने जिंकणे आवश्यक मानले जात आहे. मात्र हे आव्हान सोपे नाही. भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंकेत जाऊन कसोटी मालिका खेळायची आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची महत्त्वाची मालिका मायदेशात होणार आहे. (WTC Final 2027)



तीन संघांनी जिंकले WTC विजेतेपद :


आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी WTC विजेतेपदावर नाव कोरले आहे. भारत दोनदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचला असला, तरी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठण्याचे मोठे लक्ष्य टीम इंडियासमोर असणार आहे. (WTC Final 2027)

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे