PM Narendra Modi : पेपरफुटीवर अखेर पंतप्रधान मोदी बोलले! फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा; आंदोलक विद्यार्थ्यांना दिलं मोठं आश्वासन

दिल्ली: देशभरात चर्चेत असलेल्या नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावर केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांची जलद सुनावणी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (PM Narendra Modi News)



अलीकडच्या काळात विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात काही विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले. या घडामोडींनंतर परीक्षा व्यवस्थेवर अधिक विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. (Students Protest)


सरकारच्या म्हणण्यानुसार, फास्ट ट्रॅक कोर्टामुळे पेपर लीकशी संबंधित प्रकरणांचा निकाल कमी वेळात लागण्यास मदत होईल. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करता येईल आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यास मदत होईल. (NEET Paper Leak)


 


पंतप्रधानांनी आपल्या संदेशात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी सरकार पुढेही आवश्यक ते कठोर निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे. (Jamnatr Mantar)


दरम्यान, या घोषणेनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाकडून पुढील कार्यवाही सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या (Fast Track Court) माध्यमातून पेपर लीक प्रकरणांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.


Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी