Weather Update : मुंबई, ठाणे, रायगडसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update :  गेल्या दोन दिवसांपासून मुंबई (Mumbai), उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल सेवा काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू आहे. मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे चित्र वेगळे असून काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.


हवामान विभागाने आज सकाळी (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 3 तास मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे (Pune) जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज वॉर्निंग देण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Orange Alert)



हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागांत तयार झालेली सायक्लोनिक सर्क्युलेशन प्रणाली तसेच पाकिस्तानच्या दिशेने असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरणात बदल झाला आहे. अरबी समुद्र आणि इतर भागांतून येणाऱ्या ओलाव्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.


मागील 24 तासांत माथेरान, ठाणे (Thane) तसेच कोकण (Kokan) आणि गोवा परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. (Weather Update)



हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ताशी सुमारे 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Thane Rain)


यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात अद्यापही सरासरीपेक्षा सुमारे 21 टक्के पावसाची तूट असल्याचे निरीक्षण आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता असली तरी या भागांना अजूनही जोरदार सरींची प्रतीक्षा आहे. (Monsoon Update)


Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी