पुणे : पुण्यातील शिंदेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगा अवघ्या दीड वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना अनाथ झालेल्या मुलाने २३ वर्षांनंतर संपवलं. हे सगळं एखाद्या हिंदी चित्रपटाची गोष्ट वाटत आहे ना ? पण हे असचं पुण्यातील शिंदेवाडी परिसरात घडलं आहे. (Pune Crime)
रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत सर्क्युलरमुळे मोठी चर्चा रंगली आहे. या ...
हत्या करणाऱ्या मुलाचे नाव मंथन वैद्य आहे. लहान असताना आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींना मंथन आणि त्याच्या तीन साथीदारानी मिळून संपवलं. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंथन आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही हत्या का करण्यात आली याचे कारण ऐकलं तर एखादा हिंदी चित्रपट नक्कीच आठवेल.मंथनच्या वडिलांची हत्या झाली तेव्हा तो फक्त दीड वर्षांचा होता. वडिलांच्या हत्येनंतर त्याच्या आईने घर आणि मुलाला सांभाळलं. पुण्यातील सदाशिव पेठेत एक खानावाळीचा व्यवसाय तिने सुरू केला. मात्र दुसर्या बाजूला वडिलांच्या हत्येप्रकरणात कोर्टात केस सुरू होती. मंथनने आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या संजय देशमुख याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता.
मंत्री शंभूराज देसाई; उबाठा गटाची याचिका सूडबुद्धीतून मुंबई : लोकसभेतील ६ खासदारांचे शिवसेनेत झालेले विलीनीकरण पूर्णपणे घटनात्मक आणि संसदीय ...
२३ वर्षांची बदल्याची आग अखेर शांत
एप्रिल २०२६ मध्ये संजय देशमुख जेलमधून जामिनावर बाहेर आला. त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल होते .त्याच वेळी मंथनने त्याचा गेम करण्याचं ठरवलं होते. देशमुख आणि मंथनच्या मावशीचा नवरा संदीप कोरी यांची भेट झाली. यावेळी मंथन आपला खून करणार असल्याचं संजयला समजलं. संजयने संदीप कोरीच्या माध्यमातून मंथनला धमकावून बघितले पण काहीही परिणाम झाला नाही. (Shindewadi)
- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (P.V. Sindhu) हिने जपान ओपन ...
संजय देशमुख ११ जुलै रोजी पुण्यातील मुंढवा भागातून कात्रजच्या दिशेने जात होता. त्यावेळी मंथन आणि त्याचे दोन मित्र तसेच संदीप कोर यांनी देशमुखचा पाठलाग केला. मंथनने संजयची कार कात्रज बोगद्याजवळ अडवत धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचा तपास करत सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मंथन दिनेश वैद्य आणि सौरभ सागर परदेशी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत मंथनने कबूल केले की, मियान गज्जद्दीन शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने ही हत्या केली. पोलीस तपासात उघडकीस आले की जुन्या वैमनस्यातून सूड उगवत ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.






