Pune Crime News : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून २० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; प्रियकरासह चौघांना अटक

पुणे : पुण्यातील वाघोली (Wagholi) परिसरात २० वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीने प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचा आरोप असून, पुढे आपल्या तीन मित्रांनाही तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस (Wagholi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे फरहान रिझवान शेख (२०), फजल शेख (२०), रेहान रिझवान शेख (१८) आणि साहिल (२०) अशी आहेत. चारही आरोपी हे पुण्यातील विमाननगर (Viman Nagar) परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख फरहान शेख याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ ते ३ जून २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.



अश्लील Video च्या धमकीने सुरू ठेवला छळ


पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने आपल्या तीन मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करण्यासाठी पाठवले. आरोपींनी पीडितेचे अश्लील व्हिडिओ (Obscene Video) तयार करून ते सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


अखेर पीडित तरुणीने धाडस करत वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध बलात्कार (Rape), धमकी (Threat) आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास (Investigation) सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे