Mumbai Crime Branch : मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी नागरिक ताब्यात

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसर, कांदिवली, मालाड, कुर्ला, टिळक नगर आणि मानखुर्द या परिसरांमध्ये छापेमारी केली. संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम राबवली. प्राथमिक तपासात काही व्यक्ती भारतात आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवेश करून राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Crime)



अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या ओळखीची आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आधार कार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांची सत्यता तपासली जात असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे. (Mumbai Police)


तपासादरम्यान काही जणांनी पश्चिम बंगाल सीमेमार्गे भारतात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही घुसखोरांनी आसाम सीमेलाही प्रवेशासाठी वापरल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांचा आणि संभाव्य नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.



गुन्हे शाखा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, भारतात बेकायदेशीर प्रवेश करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली, त्यामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Illegal Immigrants)


मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा वेळोवेळी विशेष मोहिमा राबवत असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.