Share Market Black Monday : 'ब्लॅक मंडे'चा शेअर बाजाराला जबरदस्त फटका! सेन्सेक्स थेट ७०० अंकांनी कोसळला; भारतासह जगभरातील बाजारात हाहाकार

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढल्याने बीएसई सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी १८० अंकांच्या आसपास घसरून व्यवहार करत होता. या घसरणीमुळे लाखो गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. मात्र, हा धक्का केवळ भारतापुरता मर्यादित नसून आशिया ते युरोपपर्यंत अनेक प्रमुख शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. (Share Market Black Monday)


शुक्रवारी ७८,१५१.४५ अंकांवर बंद झालेला सेन्सेक्स सोमवारी बाजार उघडताच ६०० हून अधिक अंकांनी घसरून ७७,५४२ वर आला. दुपारपर्यंत घसरण आणखी वाढत ७०० अंकांहून अधिक झाली. दुसरीकडे, २४,३४४ अंकांवर बंद झालेला निफ्टीही घसरून २४,१३५ च्या पातळीवर पोहोचला. (Share Market Black Monday)



आशियाई बाजारांनीही गमावली चमक :


भारतीय बाजारातील घसरणीमागे आशियाई बाजारातील नकारात्मक संकेत हे प्रमुख कारण मानले जात आहे. सेन्सेक्स-निफ्टीसाठी महत्त्वाचा निर्देशक असलेला गिफ्ट निफ्टी उघडताच १०० अंकांनी घसरला आणि नंतर ही घसरण वाढून २६२ अंकांपर्यंत पोहोचली. (Share Market Black Monday)


पानचा निक्केई निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी (KOSPI) निर्देशांकही सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसून आला. आशियातील बहुतांश बाजार लाल निशाणावर व्यवहार करत असल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. (Share Market Black Monday)



पाकिस्तानच्या बाजाराला सर्वाधिक फटका :


शेजारील पाकिस्तानच्या शेअर बाजारात सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. KSE-१०० निर्देशांक तब्बल १,७०० हून अधिक अंकांनी कोसळला, ज्यामुळे तेथील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. (Share Market Black Monday)



घसरणीमागे कोणते कारण?


तज्ज्ञांच्या मते, भारतासह जागतिक बाजारातील या मोठ्या घसरणीमागे मध्य पूर्वेतील वाढता तणाव हे प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. (Share Market Black Monday)



विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढता तणाव, इराणवरील निर्बंध आणि तेलपुरवठ्यावर निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे ऊर्जा बाजार हादरला आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम महागाई, उद्योग आणि शेअर बाजारावर होत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. (Share Market Black Monday)



गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेऊ नयेत :


बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, बाजारतज्ज्ञांनी घाईघाईने गुंतवणूक विकण्याऐवजी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक राजकीय घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारे बदल हे पुढील काही दिवसांत बाजाराची दिशा ठरवू शकतात. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे 'ब्लॅक मंडे' अशी चर्चा आर्थिक वर्तुळात रंगली असून, पुढील सत्रांमध्ये बाजार सावरतो की घसरण कायम राहते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. (Share Market Black Monday)

Comments
Add Comment

E20 Petrol : E20 पेट्रोलवर सरकारची संसदेत स्पष्ट भूमिका; इंजिन खराब झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा

नवी दिल्ली : ई-20 पेट्रोलबाबत (E20 Petrol) सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमधील धक्कादायक घटना; साडी खांबाला अडकता-अडकता राहिली, मोठा अनर्थ टळला

मुंब्रा : मुंबई लोकल (Mumbai Local) ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असली तरी गर्दीमुळे (Crowd) दररोज जीव धोक्यात घालून प्रवास

Delhi Protest : दिल्लीतील आंदोलन प्रकरणाला नवे वळण; पाकिस्तान कनेक्शनची चौकशी, ७० जण ताब्यात

नवी दिल्ली : संसद मार्चदरम्यान (Parliament March) राजधानी दिल्लीत झालेल्या आंदोलन (Violence) प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या

BMC News : प्रसुतीगृहांमध्ये माता व बाल रुग्णालयाच्या धर्तीवर वैद्यकीय उपचार, महापालिका सभागृहात ठराव

पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे प्रशासनाचे निर्देश मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व

Bus Accidents Mumbai : मानखुर्दमधील बेस्ट बस दुघर्टनेची चौकशी करा, महापौरांनी दिले आदेश

सात महिन्यात बेस्ट बसच्या १० अपघातात १० जणांचे मृत्यू मुंबई : मानखुर्द येथील झालेल्या बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident)

Birth Certificate : जन्म दाखल्याच्या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेचे नियमित होणार लेखापरिक्षण

जन्म दाखले वितरीत करण्याची प्रक्रिया त्वरीत सुरु करण्याची सभागृहाची मागणी प्रमाणपत्रातील नावातील बदलामुळे