Sunday, July 19, 2026

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीत मोठी घसरण कायम! खरेदीची सुवर्णसंधी? जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीत मोठी घसरण कायम! खरेदीची सुवर्णसंधी? जाणून घ्या आजचे ताजे दर

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम असून, आज (१९ जुलै) मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या किंमती सातत्याने कमी होत असून, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराई, सण-उत्सव किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. (Gold-Silver Price Today)

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, रुपयाचे अवमूल्यन आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर होत असून, त्यानुसार दरात सतत बदल होत आहेत. (Gold-Silver Price Today)

आजचे सोने-चांदीचे ताजे दर :

आज २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १,४१,६१० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. काल हा दर १,४२,६८० रुपये होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या किंमतीत सुमारे १,००० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तर आणखी मोठी घसरण दिसून आली आहे. आज प्रति किलो चांदीचा दर २,१६,८६० रुपये इतका आहे. काल हा दर २,३५,००० रुपये होता. त्यामुळे एका दिवसात चांदी तब्बल १८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. (Gold-Silver Price Today)

तुमच्या शहरात आज किती आहे सोन्याचा भाव?

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत –

२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) – ₹१,४१,३६० २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) – ₹१,२९,५८० १८ कॅरेट सोने (१० ग्रॅम) – ₹१,०६,०२०

तर राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४१,११०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२९,३५१ इतका आहे.

घसरणीमागे नेमकं कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील आर्थिक धोरणांबाबतची अनिश्चितता, महागाईची चिंता आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर उच्च पातळीवर कायम राहण्याची शक्यता यामुळे सोन्या-चांदीवर दबाव वाढला आहे. तसेच जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायांकडे वळल्यानेही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण झाली आहे. (Gold-Silver Price Today)

महिनाभरात किती स्वस्त झाले सोने-चांदी?

महिनाभरापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४७,५३० प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर दरात सातत्याने घसरण होत गेली आणि आठवडाभरापूर्वी तो ₹१,४४,००० च्या आसपास आला. आता आठवड्याच्या अखेरीस तो ₹१,४१,६१० पर्यंत खाली आला आहे. चांदीच्याही किंमतीत मोठी घसरण झाली आहे. महिनाभरापूर्वी ₹२,३३,८२० प्रति किलो असलेली चांदी आता ₹२,१६,८६० पर्यंत खाली आली आहे. (Gold-Silver Price Today)

आता सोने-चांदी खरेदी करावी का?

तज्ज्ञांच्या मते, लग्नसराई किंवा सण-उत्सवासाठी खरेदी करायची असल्यास सध्याचे दर तुलनेने फायदेशीर ठरू शकतात. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरचा दर, अमेरिकेचे व्याजदर आणि जागतिक आर्थिक घडामोडी लक्षात घेता, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Gold-Silver Price Today)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा