Navnath Ban : संजय राऊत देशातील तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत; त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – नवनाथ बन

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Uddhav Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay raut) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील तरुण वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असून, तरुणांना भडकवून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.


मुंबईतील भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई केली आहे. स्टार्टअप, मेक इन इंडिया आणि इतर उपक्रमांमध्ये देशातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांचा सरकारवरील विश्वास कायम असल्याचे त्यांनी सांगितले.



आदित्य ठाकरे यांच्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी भगव्या विचारांपासून दूर जाण्याचा आरोप केला. हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम राहूनच नेतृत्व करता येते, असेही त्यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांनी रामाच्या नावाने आंदोलन करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या भवितव्याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.Maharashtra Politics


संजय राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन यांनी ईडी (ED) आणि इतर तपास यंत्रणांबाबत केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तपास यंत्रणा कारवाई करत असल्याचे सांगत त्यांनी ईडीवर टीका करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. पत्राचाळ प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. (Shiv Sena UBT)



याशिवाय, निवडणूक आयोग आणि केंद्रीय संस्थांबाबत विरोधकांची भूमिका परिस्थितीनुसार बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निकाल अनुकूल आला तर संस्थांचे कौतुक आणि प्रतिकूल आला तर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, अशी टीका त्यांनी केली. (Sanjay Raut News)


दरम्यान, भाजपच्या या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे