UBT Protest : उबाठा गटाच्या शिवाजी पार्कवरील आंदोलनप्रकरणात तीन गुन्हे दाखल

मुंबई : पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला (Protest) पाठिंबा देण्यासाठी उबाठा गटाच्या वतीने मुंबईतील (Mumbai) दादर परिसरात रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या आंदोलनाविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन करणे, बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे आणि दादर परिसरामध्ये रस्ता अडवून मोठी वाहतूक कोंडी निर्माण केल्याचा ठपका उबाठा गटाच्या आयोजकांवर ठेवण्यात आला आहे.



उबाठा गटाने रविवारी दादरच्या (Dadar) शिवाजी पार्क परिसरात या आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनासाठी पोलिसांची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, आंदोलनाला पोलिसांची कोणतीही परवानगी नसतानाही पक्षाच्या वतीने कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने घटनास्थळी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. बेकायदेशीरपणे जमाव जमवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुख्य आंदोलन संपल्यानंतरही दादर परिसरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. यामुळे दादरसारख्या अत्यंत गजबजलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि रस्ते अडवले गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे