India vs England : भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावत पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर दिले. 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने दमदार फलंदाजी करत 110 चेंडूत 138 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले. (Rohit Sharma)
रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिल्या 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलसोबत (Shubman Gill) त्याने 147 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. पुढे आणखी वेगाने धावा करत त्याने आपल्या कारकिर्दीतील 34 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले.( India vs England)
हिटमॅनने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
या शतकासह रोहितने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. इंग्लंडमध्ये खेळताना त्याने आठवे शतक झळकावले आणि परदेशात एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar) विक्रम मागे टाकला. सचिनने एका देशात सात शतके केली होती, तर आता रोहितच्या नावावर इंग्लंडमध्ये आठ शतके झाली आहेत. (Rohit Sharma News)
रोहितच्या एकदिवसीय कारकिर्दीतील एकूण 34 शतकांपैकी 22 शतके परदेशात आणि 12 शतके भारतात आली आहेत. इंग्लंडव्यतिरिक्त त्याने ऑस्ट्रेलियात 6, दक्षिण आफ्रिकेत 2, श्रीलंकेत 2, झिम्बाब्वेत 2, संयुक्त अरब अमिरातमध्ये 1 आणि बांगलादेशमध्ये 1 शतक झळकावले आहे. ( ODI Cricket)
दरम्यान, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची रोहितची इच्छा असल्याचेही बोलले जात आहे. वय वाढत असले तरी त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे निवड समितीसाठी सोपे नसल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. ( Team India)
यशस्वी जैस्वालला संधी कशी मिळणार?
यशस्वी जैस्वाल हा भारतातील सर्वात प्रतिभावान युवा फलंदाजांपैकी एक मानला जातो. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याची किमया त्याने केली असली, तरी गेल्या तीन वर्षांत त्याला केवळ 6 एकदिवसीय, 23 टी-20 आणि 29 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
संघ व्यवस्थापनाची भूमिका अशी असू शकते की, जैस्वालसारख्या गुणी खेळाडूला दीर्घकाळ राखीव बाकावर बसवून त्याच्या क्षमतेचा अपव्यय होऊ नये. मात्र, अंतिम निर्णय घेताना निवड समितीला संघाचा समतोल, खेळाडूंचा फॉर्म आणि भविष्यातील नियोजन अशा अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे.
दुसरीकडे, जगभरातील विविध खेळपट्ट्यांवर मोठ्या धावा करण्याची क्षमता असलेला रोहित शर्मा अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतासाठी संकटमोचक ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी तितक्याच प्रभावी खेळाडूची निवड करणे हे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक असेल.(Cricket News)