India Iran : तेहरानचा प्रवास पुढे ढकला, इराण तातडीने सोडा', भारतीय दूतावासाची नागरिकांसाठी सूचना

तेहरान: अमेरिकेसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणमधील महत्त्वाच्या शहरांसह चाबहार बंदर आणि अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले असून, या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.(Iran)



दूतावासाने इराणमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध विमान सेवांचा वापर करून लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सद्यस्थितीत कोणत्याही कारणास्तव इराणचा प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आपला प्रवास तात्काळ पुढे ढकलावा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. भारतीयांनी लष्करी हालचालींचे प्रांतांपासून दूर राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशी ताकीदही देण्यात आली आहे.(Indian Embassy)



पश्चिम आशियातील या अस्थिर परिस्थितीमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम आशियातील विविध देशांमध्ये कोट्यवधी भारतीय रहिवासी व कामगार असून, या युद्धाच्या छायेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही अनेक भारतीय विशेष मोहिमांद्वारे सुरक्षितपणे परतले आहेत. अमेरिकेचे आक्रमक धोरण आणि इराणचा प्रत्युत्तराचा पवित्रा यामुळे निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीवर भारताचे परराष्ट्र मंत्रालय बारीक लक्ष ठेवून आहे.

Comments
Add Comment

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री

PM Narendra Modi Uzbekistan Visit : भारत-उझबेकिस्तान संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याची घोषणा

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत

India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले

काठमांडू : भारताचे चौथे विमान रविवारी मदत सामग्रीची चौथी खेप घेऊन काठमांडूमध्ये पोहोचले आणि आपत्तीग्रस्त देश

PM Narendra Modi Uzbekistan Visit : पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानकडून सर्वोच्च सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ प्रदान

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राजकीय सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ देऊन

Kyiv Ukraine Weapons Depot Explosion : कीवजवळ शस्त्रसाठ्यावर ड्रोन हल्ला; भीषण स्फोटात ३७ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

कीव : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवजवळील मिला गावात मोठी दुर्घटना घडली आहे.