Nashik : पत्नी आणि मुलाची हत्या करून पतीची आत्महत्या; नाशिकमध्ये खळबळ

Nashik : नाशिकमधून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकरोडच्या (Nashik Road) जेलरोड भागातील (Jail Road Area) गोकुळ नगर परिसरात पतीने पत्नी आणि लहान मुलाची हत्या करून स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण एकनाथ हजारे (वय ५४) आत्महत्या (Suicide) केलेल्याचे नाव असून, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ( Nashik Crime News )



पतीची प्रकृती चिंताजनक


पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर पतीने स्वतः विषारी औषध पिऊन जीवन संपविणण्‍याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. त्‍याला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, शहरातील इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) वनसंपदा सोसायटी उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणीची (Woman) गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सदर प्रकरणातील संशयित आरोपीनेही काही तासांतच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गोकुळ नगर परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळजनक घडली आहे. ( Nashik Crime News )



इंदिरानगर परिसरात नेमकं काय घडलं होतं ?


नाशिकच्या इंदिरानगर येथे रात्री १०. ३० च्या सुमारास वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ वैष्णवी अनिल आवारे या तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. वैष्णवी ही मूळची जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. रात्री वैष्णवी सोसायटीजवळून जात असताना, एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले आणि वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. ती निपचित पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. धक्कादायक म्हणजे शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून हत्या केल्यानंतर संशयित साहिल अशोक लाव्हारे यानेही इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमध्ये एका झाडावर गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविण्याची घटना घडली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे