Monday, July 20, 2026

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनकडून पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक भावुक! पत्रकार परिषदेत दाटला कंठ, अश्रू अनावर होताच...

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनकडून पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक भावुक! पत्रकार परिषदेत दाटला कंठ, अश्रू अनावर होताच...

न्यू जर्सी : फिफा विश्वचषकातील सर्वात चर्चित सामन्यांपैकी एक ठरलेल्या स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर अर्जेंटिनाच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले आहे. न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर झालेल्या या लढतीत युरोपियन चॅम्पियन स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करत स्पर्धेत मोठा धक्का दिला. या पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी (Lionel Scaloni) पत्रकार परिषदेत भावुक झाले आणि अश्रू अनावर झाल्याने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अर्धवट सोडली. (FIFA WORLDCUP 2026)

स्पेनने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत अर्जेंटिनाला बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडले. संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि स्पर्धेतील त्यांचा प्रवास निराशाजनक ठरला. (FIFA WORLDCUP 2026)

'कराराचा सन्मान करेन, पण विचार करण्याची गरज आहे' :

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्कालोनी (Lionel Scaloni) यांनी आपल्या भवितव्याबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आपण आपल्या कराराचा पूर्ण आदर करणार आहोत. मात्र, पुढे काय करायचे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "मला काय करायचे आहे, याची कल्पना आहे. मी माझ्या कराराचा आदर करेन. त्यानंतर पुढील निर्णय घेईन. एवढे मोठे यश पुन्हा मिळवणे शक्य होईल का, याचाही विचार करावा लागेल," असे स्कालोनी म्हणाले. (FIFA WORLDCUP 2026)

'विजयातही नम्र, पराभवातही नम्र राहायला हवे' :

भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना स्कालोनी यांनी आपल्या खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी (Lionel Scaloni) सांगितले की, या संघाने देशासाठी अनेक ऐतिहासिक क्षण दिले आहेत आणि एका पराभवामुळे त्यांचे योगदान विसरता कामा नये. "मी माझ्या संघाच्या आठवणी, त्यांनी मिळवलेले यश आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत कायम जपून ठेवेन. विजयात आपण नम्र असतो, तसेच पराभवातही नम्र राहिले पाहिजे. आम्ही सामना हरलो, हे आम्ही स्वीकारतो. पण त्यामुळे आम्ही केलेली सर्व मेहनत किंवा मिळवलेले यश विसरून चालणार नाही," असे त्यांनी सांगितले. (FIFA WORLDCUP 2026)

अश्रू अनावर; प्रेस कॉन्फरन्स अर्धवट सोडली :

पत्रकार परिषद संपत आली असताना स्कालोनी (Lionel Scaloni) यांच्या भावना अनावर झाल्या. बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू तरळले आणि "मला खूप दुःख होत आहे," एवढेच शब्द उच्चारत त्यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली. स्कालोनी यांच्या या भावनिक क्षणाने उपस्थित पत्रकार आणि फुटबॉल चाहत्यांनाही हेलावून टाकले. अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाच्या डोळ्यातील अश्रूंनी पराभवाचे दुःख किती खोलवर आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा दिली. (FIFA WORLDCUP 2026)

आता या पराभवानंतर अर्जेंटिना नव्या जोमाने पुनरागमन करण्यासाठी कशी तयारी करते आणि स्कालोनी (Lionel Scaloni) आपल्या भवितव्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे. (FIFA WORLDCUP 2026)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >