Pune Crime : पुण्यात मध्यरात्री तरुणावर गोळीबार; पुढे जे घडलं ते एखाद्या सिनेमासारखंच…

पुणे : पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणावर गावठी पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करडे गावात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



स्मशानभूमीजवळ घडला थरार


हल्ला झालेल्या तरुणाचं नाव निखिल थेऊरकर (वय 23) आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास करडे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील स्मशानभूमी परिसरात निखिलला काही लोकांनी बोलावून घेतले. जुन्या व्यवहाराच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये तुफान वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.


वाद सुरू असतानाच, आरोपींनी गावठी पिस्तुलातून निखीलवर सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकवत त्याने तात्काळ शेजारील तळ्याकडे धाव घेतली आणि पाण्यात उडी मारली. अंधाराचा फायदा घेत तो तळे पोहत पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. त्यामुळे आरोपींच्या तावडीतून त्याची सुटका झाली आणि कसाबसा त्याचा जीव वाचला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्याने शिरूर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती देत फिर्याद दाखल केली. फिर्यादीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. (Pune Crime)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदित्य लंघे (रा. करडे), बबलू सोनवणे (रा. सिंहगड रोड, पुणे), टिन्न्या शेळके (रा. रांजणगाव), रोहन पंचमुखी (रा. करडे) यांच्यासह तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपाससुरु असून तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत.

Comments
Add Comment

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Self Improvement : तुम्ही कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक तुम्हाला एकटं पाडतात? 'या' चुका ठरतात कारणीभूत

तुम्ही कोणाचं वाईट करत नसतानाही लोक तुमच्यापासून दुरावत असतील, तर त्याला तुमच्या नकळत

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी