केरळ : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा परिणाम केरळवरही झाला आहे, जे भारतात फुटबॉलसाठी ओळखले जाते. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या मोठ्या सामुदायिक स्पर्धा आणि लीगमुळे तेथील तरुणांमध्ये फुटबॉलची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते. अंतिम सामन्यापूर्वी, केरळ सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांवर होईल. (FIFA World Cup 2026)
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी, रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया ...
फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामान ईस्ट रदरफोर्ड येथील न्यू जर्सी स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. भारतात हा सामना २० जुलै रोजी रात्री १२ : ३० वाजता पाहात येणार आहे. हा सामना विद्यार्थांना पाहवा यासाठी केरळच्या शिक्षण विभगाने रविवारी (१९ जुलै) मोठा निर्णय जाहिर केला आहे. केरळमधील फुटबॉलप्रेमी विद्यार्थांना हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी रात्री जागरण करता यावे म्हणून केरळच्या शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केली आहे.
#FIFAWorldCup fever has hit Kerala 🇮🇳 Giant cutouts of Neymar, Cristiano Ronaldo and Lionel Messi popped up on a local river ahead of the tournament. 12 days to go until #Qatar2022 🏆 pic.twitter.com/29yEKQvln5
— FIFA (@FIFAcom) November 8, 2022
नवी दिल्ली : फुटबॉल विश्वाचे लक्ष लागलेल्या FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर Google ने आपल्या होमपेजवर खास Google Doodle साकारत अर्जेंटिना आणि स्पेन ...
केरळमधील फुटबॉलप्रेमी विद्यार्थ्यांनी सामन्यासाठी २० जुलै रोजी राज्य सरकारने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली होती. सर्व राजकीय पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला. सीपीआय(एम) नेते आणि माजी शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी राज्य सरकारला सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले होते, कारण रात्री उशिरा होणाऱ्या सामन्यामुळे विद्यार्थ्यांना सोमवारी शाळेत जाणे अवघड होईल असे त्यांनी म्हटले होते. सुट्टी मंजूर झाली असली तरी, पूर्वनियोजित परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील. शिक्षणमंत्री एन. शमसुद्दीन यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना 'आता तुम्ही खुश आहात का, मुलांनो?'असा संदेश देत हा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू होणारा फिफा विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुट्टीची विनंती केल्यानंतर ही सुट्टी जाहीर करण्यात आली.






