मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५० टक्क्यांच्या आतच अडकून पडला होता त्याने अखेर टक्केवारीत पन्नाशी पार केली. त्यामुळे मुंबईला होणाऱ्या वर्षभराच्या एकूण पाणी पुरवठ्याच्या तुलनेत शनिवार दिनांक १८जुलै पर्यंत ५०.७७ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये सेंटीमीटरमध्ये पाण्याचा पातळी वाढत असतानाच शुक्रवार ते शनिवारी या २४ तासांमध्ये एक टक्क्याने पाण्याची पातळी वाढली आहे. शुक्रवारी या सर्व धरणांमध्ये एकूण ४९.७८ टक्के एवढा पाणी साठा होता आणि बुधवार ०८ जुलैपासून या सर्व धरणांमधील पाणी ४९ टक्क्यांच्या आतच रेंगाळत होता.
(Mumbai's water stock)
Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड
पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा
मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर ...
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमध्ये मुंबईकरांच्या वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा अपेक्षित मानला जातो. पण शनिवारी सकाळी घेतलेल्या नेांदीनुसार या सर्व धरणांमधील पाणी साठा हा ५०.७७ टक्के अर्थात ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. यापूर्वी ६ जुलै २०२६ रोजी विहार आणि तुळशी तलाव ओसंडून भरु वाहूल लागले होते. त्यामुळे हे दोन्ही तलाव भरले असले तरी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये केवळ ४५ टक्केच पाणी साठा आहे. तर मध्य वैतरणामध्ये ४५ टक्के, तानसा धरणामध्ये ८० टक्के, मोडक सागरमध्ये ७७ टक्के आणि अप्पर वैतरणा धरणात ३० टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे. तानसा धरणामध्ये ८० टक्के पाणी साठा जमा झाला असला तरी हे तलाव ओसंडून वाहण्यासाठी दीड मीटरचे अंतर आहे.
(BMC News)
BMC: रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करा
अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ...
या सर्व धरणांमध्ये १८ जुलै २०२६ रोजी ५०.७७ टक्के एवढा पाणी साठा असला तरी याच तारखेला मागील वर्षी
८१.४७ टक्के एवढा पाणी साठा होता आणि त्या आधीच्या वर्षी म्हणजे सन २०२४मध्ये ३८.४७ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे मागील वर्षी पेक्षा पाणी साठा कमी असला तरी त्या आधीच्या म्हणजे सन १८ जुलै २०२४च्या तुलनेत हा पाणी साठा अधिक आहे.
Mojtaba Khamenei : ट्रम्प यांच्या स्वाक्षरीला काहीच किंमत नाही- मोजतबा खामेनेई
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेवर जोरदार टीका करत मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने अलीकडेच झालेल्या ...
१८ जुलै ची मागील तीन वर्षांतील स्थिती
सन २०२६ : ० ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर (५०.७७ टक्के)
सन २०२५ : ११ लाख ७९ हजार १४७ दशलक्ष लिटर ( ८१.४७ टक्के)
सन २०२४ : ०५लाख ५६ हजार ७८२ दशलक्ष लिटर (३८.४७ टक्के)