Nashik : उन्नत नाशिक अभियानाची हरित झेप; 'मिशन ग्रीन मान्सून'चा चौथा टप्पा रविवारी; दरी आणि शिवणई परिसरात वृक्षलागवड

Nashik : नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan ) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत 'हरित कुंभ – हरित मान्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (दि. १९ जुलै) पार पडणार आहे. (Nashik News )



देशी वृक्षांची लागवड करणार


या टप्प्यात सकाळी ९ वाजता दरी येथील दऱ्याई माता देवस्थान परिसरात, तर सकाळी १०.३० वाजता शिवणई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसरात विद्यापीठाच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) उपकेंद्राला हरित पर्यावरणाची जोड मिळणार आहे. विद्यार्थ्यांना हिरव्यागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात शिक्षण घेता यावे, तसेच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Nashik News )



पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप


'उन्नत नाशिक अभियान'च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, युवक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. या अभियानाची सुरुवात २८ जून रोजी सातपूर येथील देवराई परिसर आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर मसरूळ वनराई (पिकॉक गार्डन) आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात सुमारे सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर सहा हजार देशी वृक्षांची लागवड करून हरित संरक्षण कवच उभारण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला. (Nashik News )



दरी आणि शिवणई परिसरात वृक्षलागवड


चौथ्या टप्प्यात दऱ्याई माता देवस्थान परिसरातील डोंगराळ भागात देशी वृक्षांची लागवड करून हरित वैभव वाढविण्यात येणार आहे. तसेच शिवणई येथील पुणे विद्यापीठ उपकेंद्र परिसर भविष्यात पर्यावरणपूरक आणि निसर्गरम्य शैक्षणिक संकुल म्हणून विकसित करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पर्यावरण संवर्धनाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग