Lionel Messi on Lamine Yamal : यामालसोबतच्या व्हायरल फोटोवर मेस्सीची पहिली प्रतिक्रिया,"आता आम्ही एकमेकांचा…"

न्यू यॉर्क : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यात खेळला जाणार आहे. मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अर्जेंटिनाला २०२६ फिफा विश्चचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. अर्जेंटिनाला रोखण्यासाठी स्पेनचा संघ देखील सज्ज आहे. या सामन्यात मेस्सी आणि लामिन यामल दोघेही पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच मेस्सी आणि यामालचे काही फोटो तुफान व्हायरल झाले होते. यावर आता मेस्सीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Lionel Messi)



पहिल्यांदाच मेस्सी विरुद्ध यामाल


मेस्सी हा फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतील सर्वात अनुभवी खेळाडू आहे.यामाल हा फुटबॉल विश्वातील सर्वात युवा खेळाडू आहे.या दोघांचा आमना सामना पाहण्यासारखा असणार आहे. (Lamine Yamal)



व्हायरल होत असलेल्या फोटोवर मेस्सीची प्रतिक्रिया


काही दिवसांपूर्वीच मेस्सी आणि यामाल या दोघांचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मेस्सी एका चिमुकल्याला अंघोळ घालताना दिसून येत आहे. हा चिमुकला दुसरा कोणी नसून, तो स्वत:लामिन यामाल आहे. या व्हायरल फोटोवर बोलताना मेस्सी म्हणाला, ही किती आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की, आता आम्ही एकमेकांचा सामना करणार आहोत. ज्यावेळी हा फोटो क्लिक करण्यात आला होता, त्यावेळी तो खूप लहान होता. लामिन खूप टॅलेंटेड आहे. मी त्याला फॉलो करतो, कारण तो त्या क्लबसाठी खेळतो जो माझा आवडता क्लब आहे. मला नेहमीच वाटतं, त्याने आणखी चांगलं करावं.” (FIFA World Cup 2026)



पुढे बोलताना मेस्सी म्हणाला, १९ वर्षाच्या वयात यामाल जगातिल सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे. तो त्याच्या करियरमध्ये ऐतिहासिक कामगिरी करू शकतो.पण आम्ही असं होऊ देणार नाही, त्याला रोखण्यासाठी आम्ही पूर्ण जोर लावू.अंतिम सामन्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना भारतीयवेळेनुसार सोमवार २० जुलै रोजी रात्री १२:३० वाजता सुरु होणार आहे.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या