Thursday, July 16, 2026

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण अपघात (Accident) झाला. आरईआरएस (RERS) इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून मोठी क्रेन (Crane) अचानक कोसळून खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडली. या दुर्घटनेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्समध्ये आरईआरएस (RERS) इमारतीचे बांधकाम सुरू असून, साहित्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन (Crane) ११ व्या मजल्यावर कार्यरत होती. अचानक क्रेनमध्ये बिघाड झाल्याने ती थेट खाली कोसळली. क्रेनचा मोठा भाग पार्किंग (Parking) परिसरातील चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर पडल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली.

क्रेनच्या ढिगाऱ्याखाली एक २१ वर्षीय तरुण अडकला होता. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने (Rescue Team) त्याला बाहेर काढून तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल (Fire Brigade), स्थानिक पोलीस (Police) आणि आपत्कालीन बचाव पथक (Emergency Rescue Team) घटनास्थळी दाखल झाले. लोखंडी अवशेष हटवण्यासाठी आणि दबलेली वाहने बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त क्रेन (Crane) तसेच कटर (Cutter) यंत्राचा वापर करून युद्धपातळीवर मदतकार्य करण्यात आले.

सुदैवाने ही क्रेन थेट वर्दळीच्या ठिकाणी न पडता पार्किंग परिसरात कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत एका २१ वर्षीय तरुणाचा जीव गेला असून अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी बांधकाम साईटवरील सुरक्षा व्यवस्था (Safety Measures) आणि देखभाल (Maintenance) यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रेन कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाची सखोल चौकशी (Investigation) करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित विकासक (Developer) आणि कंत्राटदार (Contractor) यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा