Nashik : भाजप नगरसेविका, कार्यकर्त्यांचा वेळेवर मदतीचा हात, बीएलओ कर्मचाऱ्याचा वाचला जीव

Nashik : निवडणूक कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या बीएलओ कर्मचाऱ्याला भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे (Monika Hire) आणि कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात दाखल केले. तातडीने अँजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिरे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या तत्पर मदतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



नेमकं काय घडलं ?


प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लिपिक म्हणून कार्यरत असलेले कुणाल जगन्नाथ कलाल हे सध्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील फुलेनगर (Phulenagar) परिसरातील राहुलवाडी येथील महापालिका शाळा क्रमांक ५६ जवळील सभागृहात 'बीएलओ' म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मंगळवारी दुपारी सुमारे एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान काम सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.


याच वेळी केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे तसेच अजिंक्य पगारे, सोनू दोंदे आणि बाबा शेख यांनी कलाल यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात घेतले. त्यांनी कोणताही विलंब न करता त्यांना समोरील डॉ. अविनाश पाटील यांच्या दवाखान्यात नेले.



प्राथमिक तपासणीनंतर डॉ. पाटील यांनी पुढील उपचारासाठी पंचवटी येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने कलाल यांना कार्डियाक केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्वरित अँजिओप्लास्टी केली. उपचारानंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे