Marathi Actors Divorce : मराठी मनोरंजन विश्वाला धक्का! आदिनाथ-उर्मिला यांनी अधिकृतपणे जाहीर केला घटस्फोट

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) यांनी अखेर त्यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट (Divorce) घेतल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे केली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून आदिनाथ आणि उर्मिला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. मात्र, यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता दोघांनी संयुक्त निवेदन (Joint Statement) प्रसिद्ध करत आपल्या विभक्त होण्याच्या निर्णयाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, "आमचे मित्र, मीडिया (Media) आणि हितचिंतकांनो, खूप विचारांती आम्ही दोघांनी परस्पर संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारीने सहपालकत्व (Co-parenting) निभावत राहू."





यासोबतच त्यांनी एकमेकांबद्दलचा आदर कायम असल्याचंही स्पष्ट केलं. "एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर राहील. गेल्या अनेक वर्षांत मीडिया आणि चाहत्यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यातही तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील, अशी अपेक्षा आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.


शेवटी दोघांनी त्यांच्या खासगी आयुष्याचा (Privacy) आदर करण्याची विनंती केली आहे. "आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा. या विषयावरील हेच आमचं एकमेव अधिकृत वक्तव्य (Official Statement) असेल. यानंतर आम्ही यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा चर्चा करणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.


आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांकडून दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत