Mahaprabhu Jagannath : 'तुमच्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा': बाबा रामदेव यांचे ‘महाप्रभू जगन्नाथ’ला समर्थन; 17 जुलै रोजी देशभर प्रदर्शित होणार

रथयात्रेपूर्वी ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या निर्मात्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे घेतले आशीर्वाद; 17 जुलै रोजी भारतासह परदेशात भव्य प्रदर्शित होणार



आगामी अॅनिमेटेड चित्रपट ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या ( Mahaprabhu Jagannath) निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी योगगुरू बाबा रामदेव यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. बाबा रामदेव म्हणाले, “महाप्रभू जगन्नाथ हे आपल्या जीवनाचे अधिष्ठाता आहेत. ते आपल्या सनातन संस्कृतीचे प्राण आहेत. त्यांचे जीवन, दिव्य लीला, संदेश, शिकवण आणि त्यांच्यावरील भक्ती ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. त्यांच्याशी जोडले जाणे हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य आहे.” ( Baba Ramdev)




चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी पुढे सांगितले, “लहान मुलांमध्ये आपल्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे बीज रुजवण्यासाठी हा चित्रपट अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आला आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा, जेणेकरून ते आपल्या धर्म आणि संस्कृतीशी (Hindu Culture) जोडले जातील. जय जगन्नाथ.” ‘महाप्रभू जगन्नाथ’ हा संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनासोबतच भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा संदेश देणारा चित्रपट आहे. लोकप्रिय अॅनिमेटेड मालिका 'जय जगन्नाथ'च्या यशानंतर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे. ( Baba Ramdev Blessings)




Ele Animations Pvt. Ltd.ने Cinepolisच्या सहकार्याने हा चित्रपट 300 हून अधिक स्क्रीनवर हिंदी, ओडिया आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी केली आहे. तसेच अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते दुर्गा प्रसाद दलई, दिग्दर्शक श्रीपाद वारखेडकर, पटकथा आणि संवाद लेखिका पल्लवी शर्मा, तसेच संगीतकार अविरल कुमार आहेत. 17 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट 16 जुलैच्या पवित्र जगन्नाथ रथयात्रेनंतरच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाबा रामदेव यांचे आशीर्वाद आणि इंद्रेश उपाध्याय यांच्या उपस्थितीत 10,000 हून अधिक भाविकांसमोर झालेल्या भव्य ट्रेलर लॉन्चनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ( Sanatan Dharma)

Comments
Add Comment

Celebrity Brand Valuation Report 2025 शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड; रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे

क्रोल (Kroll) या जागतिक संस्थेने आपला 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. या अहवालानुसार

Nikita Rawal Ranbir Kapoor Controversy : रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ! 'बीफ' वक्तव्यावरून 'रामायण'वर बहिष्काराचे सावट; निकिता रावलची जाहीर माफीची मागणी

मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि निर्माते नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ या दोन

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

एकता कपूर : एकता कपूरचा सलमान खानला सडेतोड टोला ? म्हणाली- "जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी प्रत्येक भागात..."

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्यात सोशल मीडियावर एक

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'ची तारीख ठरली! सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री; कुठे आणि कधीपासून पाहायला मिळणार शो?

मुंबई : सर्वात लोकप्रिय आणि चर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक